शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

चंद्रपूर जिल्हा झाला महाराष्ट्राच्या राजकारणाचा 'पॉवर हब'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:14 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील मूलचे रहिवासी. महाराष्ट्राचे दुसरे मंत्री सुधीर मुनगंटीवार हेही चंद्रपूरचेच. आता विरोधी पक्ष नेतेपदी विराजमान होणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हेसुद्धा चंद्रपूर जिल्ह्याचेच आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील मूलचे रहिवासी. महाराष्ट्राचे दुसरे मंत्री सुधीर मुनगंटीवार हेही चंद्रपूरचेच. आता विरोधी पक्ष नेतेपदी विराजमान होणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हेसुद्धा चंद्रपूर जिल्ह्याचेच आहेत. त्यामुळे तीन वजनदार नेत्यांचे मूळ ठिकाण असलेला चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा 'पॉवर हब' बनला आहे.वडेट्टीवार यांच्या रूपाने  विदर्भाला  पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेते पदाचा मान मिळत आहे. त्यांनी तरुण वयात गडचिरोली येथून शिवसेनेच्या युवा संघटनेत सामील होऊन आपल्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केला होता. नंतर गडचिरोली जिल्हा परिषदेत नामनियुक्त सदस्य ते विरोधी पक्ष नेता हा प्रवास त्यांनी केला. शेतमजूर, वनकामगार आणि आदिवासींच्या हक्कांसाठी त्यांनी अनेकदा लढे दिले, आंदोलने केली.विजय वडेट्टीवार यांच्या विरोधी पक्ष नेतेपदामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील तीन मोठे राजकारणी राज्यात अधिकारारुढ झाले असून चंद्रपूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार