शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

चंद्रपुरातील सात सहायक पोलिस निरीक्षक बनले पोलिस निरीक्षक; अनेक महिन्याच्या लढ्याला यश

By परिमल डोहणे | Published: June 17, 2024 6:52 PM

चंद्रपूर जिल्ह्यातील सात जणांना बढती मिळाली असल्याने ते सहायक पोलिस निरीक्षकावरून पोलिस निरीक्षक बनले आहेत.

चंद्रपूर : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाखल झालेल्या विविध याचिकांमुळे सहायक पोलिस निरीक्षकांची पदोन्नती बरेच महिने रखडली होती. मात्र, महाराष्ट्र पोलिस विभागाने न्यायाधिकरणाच्या आदेशाच्या अधीन राहून ४४९ पोलिसांना पदोन्नती दिली आहे. याबाबतचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील सात जणांना बढती मिळाली असल्याने ते सहायक पोलिस निरीक्षकावरून पोलिस निरीक्षक बनले आहेत. परंतु, त्यांची इतर जिल्ह्यात बदली झाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांची गडचिरोली, माजरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सारंग मिराशी यांची नागपूर, पडोली पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक नागेशकुमार चातरकर यांची नागपूर शहर, पोलिस अधीक्षकांच्या वाचक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक पंकज बोडसे यांची नागपूर शहर, अपर पोलिस अधीक्षकांच्या वाचक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शैलेश ठाकरे यांची गडचिरोली, दुर्गापूर सहायक पोलिस निरीक्षक विजय रत्नपारखी यांची अकोला, तर बल्लारपूरचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण तळी यांची बुलढाणा येथे पदोन्नतीवर बदली झाली आहे.पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकांची यादी विभागीय पदोन्नती समितीने तयार केली होती. मात्र, याबाबत काही सहायक पोलिस निरीक्षकांनी न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केल्या होत्या. त्यामुळे पदोन्नतीची प्रक्रिया बरेच दिवस प्रलंबित होती. दुसरीकडे पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकांनीही पदोन्नतीची प्रक्रिया राबवावी, अशी याचिका महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाखल केली होती. न्यायाधिकरणाने दिलेल्या विविध आदेशांच्या अधीन राहून विभागीय पदोन्नती समितीने राज्यातील ४४९ सहायक पोलिस निरीक्षकांची पोलिस निरीक्षकपदावर पदोन्नती केली आहे. पदोन्नती देण्याबरोबरच त्यांच्या पदस्थापनेचे ठिकाणसुद्धा बदलण्यात आले आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सात सहायक पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. पदोन्नतीसाठी दिलेल्या लढ्याला अनेक महिन्यांनंतर यश आल्याने पदोन्नती झालेल्या पोलिस निरीक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.

टॅग्स :Policeपोलिस