शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

चंद्रपूरपाठोपाठ ब्रम्हपुरी तालुका कोरोनाचा हॉटस्पाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 5:00 AM

जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या ब्रम्हपुरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सर्वाधिक २० रुग्ण तालुक्यातील मांगली (जुगनाळा) येथे आढळून आले आहेत. तालुक्यात गुरुवारी एकाच दिवसात २८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले. चंद्रपूरपाठोपाठ ब्रह्मपुरी तालुकाही आता कोरोनाचा हॉटस्पाट ठरु पाहत आहे. या तालुक्यातील रुग्णसंख्या १०८ झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात नव्या २८ बाधितांची भर : ४३८ रुग्ण कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येतील वाढ सातत्याने सुरू असून गेल्या २४ तासात त्यामध्ये २८ बाधिताची भर पडली आहे. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत ७७७ बाधित पुढे आले असून ४३८ जणांना आत्तापर्यंत रुग्णालयातून सुटी मिळाली आहे तर ३३९ बाधितावर सध्या उपचार सुरू आहेत.जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या ब्रम्हपुरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सर्वाधिक २० रुग्ण तालुक्यातील मांगली (जुगनाळा) येथे आढळून आले आहेत. तालुक्यात गुरुवारी एकाच दिवसात २८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले. चंद्रपूरपाठोपाठ ब्रह्मपुरी तालुकाही आता कोरोनाचा हॉटस्पाट ठरु पाहत आहे. या तालुक्यातील रुग्णसंख्या १०८ झाली आहे.आतापर्यंत ब्रह्मपुरी तालुक्यात २६७० चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी २२०६ आरटीपीसीआर तर ४६४ अ‍ॅन्टिजेन टेस्ट घेण्यात आल्या असून तालुक्यात आयएलआय तसेच सारीचे सर्व्हेक्षण सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी दिली आहे. एवढया मोठया प्रमाणावर एकाच दिवशी कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ असून मांगली हे गाव ३ ऑगस्टपासून १४ दिवसांसाठी कंटेंन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. शहरातील देलनवाडी परिसरात ३ रुग्ण आढळून आल्याने रुग्ण सापडलेला परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तालुक्यातील एकूण कोरोना बधितांची संख्या १०८ वर पोहोचली असून यापैकी ग्रामीण भागातील ८० तर शहरातील २८ रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत.ब्रम्हपुरी तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव थांबण्याचे नावच घेत नाही. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सगळेच सुरळीत चालू असताना (जुगनाळा) मांगली येथील एका व्यक्तीचा २ ऑगस्टला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तेव्हापासून पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील त्या गावातील एकूण कोरोनाबधित रुग्णसंख्या ६ ऑगस्टपर्यंत २० झाली आहे. संबंधित व्यक्तीने वेळीच योग्य ती काळजी घेतली असती तर तालुक्याची स्थिती चांगली असती. परंतु संबंधित व्यक्तीने व्यवस्थित काळजी न घेतल्याने मांगली येथील बधितांची संख्या आतापर्यंत २० वर पोहोचली आहे. ब्रम्हपुरी शहरातीलसुद्धा आठ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन रुग्ण देलनवाडी, तीन रुग्ण झाशी राणी चौक तर दोन रुग्ण बाहेर जिल्ह्यातील असून शहरातील रुग्णालयात उपचारासाठी आलेले आहेत. ६ ऑगस्टला सापडलेल्या एकूण २८ रुग्णांपैकी १४ रुग्ण तालुक्यातील एकटया मांगली गावातील असून दोन रुग्ण गांगलवाडी येथील आहेत तर आठ रुग्ण ब्रम्हपुरी शहरातील आहेत. तसेच चार रुग्ण संस्थात्मक विलगीकरणातील आहेत.या परिसरातील आहेत नवे बाधितशुक्रवारी पुढे आलेल्या बाधितामध्ये १७ नागरिक अ‍ॅन्टिजेन चाचणीतून पुढे आले आहेत. यामध्ये एकट्या बल्लारपूर शहरातील १५ लोकांचा समावेश आहे. तर उर्वरित एक जण चुना भट्टी वार्ड राजुरा येथील रहिवासी आहे. अ‍ॅन्टिजेन चाचणीत अन्य १७ वा बाधित चंद्रपूर बसस्थानक परिसरात सिद्धार्थ हॉटेलजवळील आहे. या ठिकाणच्या ५४ वर्षीय एका पुरुषाचादेखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नियमित चाचणीद्वारे पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, तर भद्रावती येथील रुग्णांचा समावेश आहे.चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक रुग्णचंद्रपूर तालुक्यात जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहे. या तालुक्यात गुरुवारपर्यंत २५४ रुग्णांची नोंद आहे. यातील १८१ रुग्ण हे चंद्रपूर मनपा हद्दीतील आहेत तर ७३ रुग्ण हे चंद्रपूर तालुक्यातील आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याMaharashtraमहाराष्ट्र