राजेश भाेजेकर
Chandrapur Lok Sabha Results 2024 : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये काॅंग्रेसच्या प्रतिभा धानाेरकर यांनी भाजपाचे दिग्गज उमेदवार मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना 10,803 मतांनी पिछाडीवर टाकत पहिल्याच फेरीत माेठी आघाडी घेतली आहे. चंद्रपूर मध्येसहा विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. यामध्ये चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, वरोरा, वणी आणि आर्णी विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहे. तर बल्लारशाह विधानसभा क्षेत्राचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे महायुतीचे उमेदवार आहे. यासह वंचित बहुजन आघाडीकडून राजेश बेले यांनीही निवडणूक लढविली आहे.
२०१९ च्या निवडणुकीमध्ये चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात बाळू धानोरकर हे काँग्रेसचे महाराष्ट्रातून एकमेव खासदार निवडून आले होते. मात्र, दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. २०२४ ची निवडणूक भाजप आणि काँग्रेसनेही प्रतिष्ठेची केली. प्रचारासाठी दिग्गजांनी हजेरी लावली. प्रतिभा धानाेरकर यांनी आघाडी घेतल्याने मतदारसंघात जल्लाेष सुरू झाला आहे.
असे आहे पहिल्या फेरीतील मतदान चंद्रपूर लोकसभा निवडणूक 2024राऊंड 1 1. प्रतिभा धानोरकर - काँग्रेस- 30,0002. सुधीर मुनगंटीवार - भाजप - 19,1973. राजेंद्र रामटेके - बसप - 4874. अवचित सयाम - जगोंपा - 1065. अशोक राठोड - जविपा - 1276. नामदेव शेडमाके - गोंगपा - 1557. पूर्णिमा घोनमोडे - बरिसोपा- 398. राजेश बेले - वंबआ - 6389. वनिता राऊत - अभामाप - 4710. विकास लसंते - सराप- 4111. विद्यासागर कोसर्लावार - भिसे - 6112. सेवकदास बरके - पिपाइं(डे.) - 10313. दिवाकर उराडे - अपक्ष - 12614. मिलिंद दहिवले - अपक्ष - 7015. संजय गावंडे - अपक्ष - 21716. नोटा - 419काँग्रेस - 10,803 ने आघाडीवर