चंद्रपूर जिल्हा हा गोंडराजवट, भोसले व ब्रिटीशांच्या काळात ‘चांदा’ नावाने ओळखल्या जात होता. त्यापूर्वी ‘लोकपूर’ म्हणून या ऐतिहासिक शहराची नोंद इतिहासात आहे. कालांतराने चंद्रपूर हे नाव मिळाले. लोकपूर ते चंद्रपूर या वाटचालीत भौगोलिक, धार्मिक, सांस्कृतिक व प्रशासकीय क्षेत्रात बदल होत गेले. ब्रिटीश कालावधीत चांदा म्हणूनच नोंद आहे. १९६४ रोजी हे नाव बदलून चंद्र्रपूर झाले. काळानुसार प्रशासकीय संरचनेत बदल करण्याची गरज निर्माण झाली. या भागात इतर धार्मिक स्थळांसोबत वैरागड, कोसाळा, भद्रावती आणि मार्खंडा यांचा समावेश होतो. हिंदू आणि बुद्धिस्ट राजांनीही या क्षेत्रावर बराच काळ राज्य केल्याचे इतिहासाच्या पानातून दिसून येते.गोंडराजांनी ९ व्या शतकाच्या सुमारास आणि १७५१ नंतर नागपूरकर भोसल्यांनी या भागावर दीर्घकाळ राज्य केले. अखेरचा राजवंशी राजा रघुशी भोसले यांचा मृत्यू १८५३ रोजी झाला. भोसल्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतला. दरम्यान, ब्रिटीशांनी नागपूर व चंद्र्रपूरला एकत्र ब्रिटीश साम्राज्य म्हणून घोषित केले. स्वातंत्र्यानंतर चंद्र्रपूर हा स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. त्यावेळी केवळ तीन तहसील होत्या. मूल, वरोरा व ब्रह्मपुरी शहरांचा त्यामध्ये समाविष्ठ करण्यात आला. हे चार तहसील चंद्र्रपूरला जोडण्यात आले. मुख्यालय म्हणून सिरोंचा हा तहसील ठेवण्यात आला होता. १९८५ रोजी एका तहसील मुख्यालयाचे मूल येथून चंद्रपूरला हस्तांतरण झाले. १९०५ रोजी नवीन तहसील मुख्यालयासह गडचिरोली येथे ब्रह्मपुरी व चंद्रपूर तहसीलपासून जमीनदारी मालमत्तेसह हस्तांतरित करण्यात आले. चंद्रपुरातील जमीनदारीचा लहान हिस्सा नव्याने अस्तित्वात आलेल्या जिल्ह्याला १९०७ रोजी हस्तांतरित झाला. त्याच वर्षी क्षेत्र १ हजार ५६० चौ. कि. मी. तिन्ही विभाग मद्रास राज्यात हस्तांतरित करण्यात आले होते. यामध्ये अधिक बदल न करता १९११-१९५५ च्या काळात जिल्हा अथवा तहसीलच्या सीमांमध्ये समाविष्ठ करण्यात आल्या. १९५६ रोजी भाषावार प्रांत योजनेचा परिणाम म्हणून हा जिल्हा मध्य प्रदेश राज्यातून बॉम्बे राज्याला हस्तांतरीत करण्यात आला. त्याच कालावधीत हैद्राबाद राज्यातील आदिलाबाद जिल्ह्याचा भाग राजुरा तहसील नांदेड जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात १९५९ रोजी हस्तांतरीत करण्यात आला. मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. १९८१ च्या जनगणनेनंतर चंद्रपुरातून गडचिरोली वेगळा झाला. जिल्ह्यात आता चंद्र्रपूर, मूल, सावली, भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, गोंडपिपरी, पोंभुर्णा, राजुरा, कोरपना, बल्लारपूर व जिवती आदी सात तालुके आहेत.
लोकपूर ते चंद्रपूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 12:26 AM