निवडणूक कधी ? : चंद्रपूरकरांना पडलायं प्रश्नचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या आणि राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम बुधवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला. मात्र या यादीत चंद्रपूरचे नाव नसल्याने ‘चंद्रपूर मनपाच्या निवणुका केव्हा ?’, असा प्रश्न विचारताना बुधवारी दिवसभर अनेकजण दिसून आले.राज्यातील महानगर पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम बुधवारी जाहीर होताच एकच पळापळ सुरु झाली आहे. महानगर पालिकांच्या निवडणुकांच्या यादीत चंद्रपूर शहराचेही नाव असेल, असा कयास होता. मात्र या यादीत चंद्रपूरचे नाव नसल्याने अनेकांना प्रश्न पडला. चंद्रपूर महानगर पालिकेचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपणार आहे. त्यामुळे निवडणुका जिल्हा परिषदेनंतर येतील, असा अनेकांचा अंदाज होता. मात्र निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमात एप्रिल मजिहन्यात मुदत संपणाऱ्या उल्हासनगर महानगर पालिकेसह अन्य ठिकाणच्याही निवडणुका जाहीर केल्याने चंद्रपूरकर संभ्रमात पडलेले दिसले. अनेकांना काहीतरी चुकल्यासारखे वाटल्याने अधिकारी आणि माध्यमांच्या कार्यालयात संपर्क साधून शहानिशा करण्याचा प्रयत्नही अनेक नागरिकांनी केला. या संदसर्भात जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्याशी संपर्क साधला असता दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाकडून कार्यक्रमावली उशिरा आल्याने निवडणुकीपूर्वीची प्रक्रिया आता सुरू आहे. डिसेंबर-२०१६ अखेर प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. त्यावर ९ जानेवारीपर्यंत आक्षेप मागविण्यात आले असून त्यावरील सुनावणी २५ जानेवारीला होणार अहे. त्यानंतर अंतीम प्रभाग रचना १५ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. निवडणुकीपूर्वी मतदार याद्या तयार असणे आवश्यक असते. मात्र चंद्रपूर महानगर पालिकेतील मतदार याद्यांवरील आक्षेपांची कार्यवाही बाकी आहे. ही प्रक्रिया सुरू असून अंतीम यादी महिनाभरात प्रकाशित होण्याची शक्यता आहे. निवडणूकपूर्व प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. यामुळे निवडणुका आताच होणार नाहीत याचा अंदाज आलेले अधिकारी आणि राजकीय मंडळी सध्यतरी निवांत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)२६ नोव्हेंबर २०११ ला झाली होती चंद्रपूर मनपाची स्थापनामुळातच चंद्रपूर महानगर पालिका नव्याने अस्तित्वात आली आहे. २६ नोव्हेंबर २०११ रोजी या महानगर पालिकेची स्थापना झाली होती. त्यानंतर पहिली निवडणूक एप्रिल-२०१६ मध्ये पार पडली. नगरसेवकांच्या निवडणुकीनंतर मे-२०११ मध्ये महापौरपदाची निवडणूक झाली. महापौरपदाचा कार्यकाळ मे-२०११ पासून सुरु झाल्याने तो मे-२०१७ पर्यंत चालणार आहे. त्यामुळे या निवडणुका येत्या एप्रिल महिन्यात होतील, असा सर्वांचा अंदाज आहे.नव्याने अस्तित्वात आल्या होत्या तीन महानगर पालिकाराज्यातील तीन महानगर पालिका २०११ मध्ये नव्याने अस्तित्वात आल्या होत्या. त्यात, चंद्रपूरसह लातूर आणि परभणीचा समावेश होता. त्यापूर्वीही भार्इंदर येथे महानगर पालिका अस्तित्वात आली होती. या सर्वच ठिकाणी या टप्प्यात निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झालेला नाही. दुसऱ्या टप्प्यात या ठिकाणच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता आहे.
चंद्रपूर मनपालाही निवडणुकीचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2017 12:31 AM