लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील सात नागरी आरोग्य केंद्रामध्ये मागील चार महिन्यांपासून औषध नसल्याने रूग्णांना बाहेरून औषध खरेदी करावी लागत आहे. राज्य शासनाने मागील दोन वर्षांपासून महानगरपालिकासाठी औषध खरेदी केली नाही. मनपा प्रशासनाने या संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केला. परंतु, खरेदीला वेळ लागत असल्याचे उत्तर देत असल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी मनपाच आता औषधी खरेदी करणार असून याकरिता किमान एक आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.चंद्रपूर शहरामध्ये सात नागरी आरोग्य केंद्र आहेत. मनपा प्रशासनातर्फे ही आरोग्य केंद्रे चालविली जातात. इंदिरानगर, टिबी हॉस्पीटल रामनगर, बालाजी वॉर्ड गोपालपुरी, बगड खिडकी भानापेठ वॉर्ड, भिवापूर सुपर मार्केट आणि तुकूम येथे मागील अनेक वर्षांपासून नागरी आरोग्य केंद्रामार्फत रूग्णांना सेवा दिल्या जात आहे. सद्या पावसाचे दिवस असल्यामुळे जलजन्य आजारांनी नागरिक हैराण झाले आहेत.उपचारासाठी नागरी आरोग्य केंद्रात गेल्यास उपचारानंतर बाहेरून औषधी विकत घेण्याचे सांगितल्या जाते. हा प्रकार मागील सात महिण्यांपासून सुरू आहे.मनपा प्रशासनाने या संदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र मागील दोन वर्षांपासून औषधे खरेदी न केल्याची माहिती पत्राद्वारे मनपा प्रशासनाला कळविण्यात आली. परिणामी, रूग्णांची अडचण लक्षात घेऊन मनपालाच यातून तोडगा काढल्याशिवाय पर्याय उरला नाही. नागरी केंद्रामध्ये प्रामुख्याने आर्थिक दृष्ट्या सर्वसामान्य कुटुंबातील रूग्ण उपचारसाठी येतात. त्यामुळे बाहेरून औषधी खरेदी करताना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो, अशी खंत रूग्णांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. याकडे शासनाने त्वरीत लक्ष द्यावे.चंद्रपुरातील सात नागरी आरोग्य केंद्रामध्ये औषधसाठा नाही, याची जाणीव प्रशासनाला आहे. याबाबत तातडीने मार्ग काढण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या एक आठवड्यात मनपा स्वत: औषधे खरेदी करणार आहे.- डॉ. अंजली आंबटकरवैद्यकीय विभाग प्रमुखमनपा, चंद्रपूर
चंद्रपूर मनपाचे नागरी आरोग्य केंद्र औषधांविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 11:01 PM
शहरातील सात नागरी आरोग्य केंद्रामध्ये मागील चार महिन्यांपासून औषध नसल्याने रूग्णांना बाहेरून औषध खरेदी करावी लागत आहे. राज्य शासनाने मागील दोन वर्षांपासून महानगरपालिकासाठी औषध खरेदी केली नाही. मनपा प्रशासनाने या संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केला. परंतु, खरेदीला वेळ लागत असल्याचे उत्तर देत असल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी मनपाच आता औषधी खरेदी करणार असून याकरिता किमान एक आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ठळक मुद्देशासनाचे दुर्लक्ष : सात महिन्यांपासून औषध खरेदीच नाही