लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊन काळात सुरु असलेल्या दारुच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील पोलिसांनी नऊ ठिकाणी धाड टाकून १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई नागभीड, भद्रावती, घुग्घुस, राजुरा, पडोली, भिसी, शेगाव आदी ठिकाणी करण्यात आली.नागभीड पोलिसांनी अवैध मोहा दारुविक्री करणाऱ्या विरोधात विशेष मोहीम राबवून एक लाख १३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भद्रावती पोलिसांनी दोन ठिकाणी धाड टाकून आठ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांना अटक केली. राजुरा पोलिसांनी दोन ठिकाणी धाड टाकून दोन लाख ७७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन चार जणांना अटक करण्यात आली.घुग्घुस येथे दोघांना अटक करुन १३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत एकाला अटक करुन ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. भिसी पोलिसांनी एकाला अटक करुन ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शेगाव पोलिसांनी एकाला अटक करुन १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एकाच दिवशी जिल्हाभरात राबवलेल्या धाडसत्राने दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.दोन ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेची धाडस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भद्रावती व साखरी परिसरात धाड टाकून पाच लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. भद्रावती परिसरात दोन दुचाकी वाहनचालकास ताब्यात घेऊन एक लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर दुसºया कारवाईत साखरी येथे मारोती वाहनातून २४ पेट्या देशी दारु व वाहन असा एकूण तीन लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक विलास मुंडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
दारु तस्कराविरोधात चंद्रपूर पोलिसांचे धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 1:03 AM
नागभीड पोलिसांनी अवैध मोहा दारुविक्री करणाऱ्या विरोधात विशेष मोहीम राबवून एक लाख १३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भद्रावती पोलिसांनी दोन ठिकाणी धाड टाकून आठ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांना अटक केली. राजुरा पोलिसांनी दोन ठिकाणी धाड टाकून दोन लाख ७७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन चार जणांना अटक करण्यात आली.
ठळक मुद्देनऊ ठिकाणी धाडी : ११ जणांना अटक, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त