शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Vidhan Sabha Election Result 2024 Live : राज्यातील पहिला निकाल जाहीर: महायुतीची लाडकी बहीण जिंकली; आदिती तटकरेंचा विजय निश्चित
2
Maharashtra Assembly Election Result 2024: करेक्ट कार्यक्रम! महाविकास आघाडीला केवळ ५१ जागांवर आघाडी; पवार-ठाकरेंची सहानुभूती संपली?
3
Maharashtra Assembly Election 2024 Result Worli Vidhansabha: वरळीत मोठा धक्का! आदित्य ठाकरे पाचव्या फेरीअखेर पिछाडीवर, आघाडीवर कोण?
4
Nanded Lok Sabha By Election Results 2024: नांदेडमध्ये काँग्रेसची जागा धोक्यात, भाजपला किती मताधिक्य?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: "महायुतीच्या विजयात संजय राऊतांचा सिंहाचा वाटा, ऊर बडवण्याशिवाय..."; नेत्यांनी उडवली खिल्ली
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर, मनसेची संतप्त टीका; नेते म्हणाले, “भाजपाने शब्द फिरवला...”
7
Maharashtra Assembly Election 2024 Result : चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले, "ते सोबत येणं हा..."
8
Vikhroli Vidhan Sabha Election Result 2024 Live : विक्रोळीत पुन्हा एकदा राऊतांचीच हवा, हॅटट्रिक साधणार?; ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर
9
"कुछ तो गडबड है, हा कौल कसा मानावा?’’ संजय राऊत यांनी निकालावर व्यक्त केली शंका
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : खरी शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंचा लागतोय कस, एकनाथ शिंदे ठरतायत सरस! असा आहे आतापर्यंतचा कल
11
Nanded Loksabha ByPoll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काय घडतेय? भाजप की काँग्रेस आघाडीवर...
12
Kolhapur Vidhan Sabha Election Result 2024 Live : कोल्हापुरात कोणत्या मतदारसंघात कोणाची आघाडी? जाणून घ्या प्रत्येक अपडेट...
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीची जोरदार मुसंडी, ठोकलं द्विशतक; मविआची मोठी पिछेहाट, असं आहे आतापर्यंतचं चित्र
14
Maharashtra Assembly Election Results : सुरुवातीच्या कलात काँग्रेसला धक्का; बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम पिछाडीवर!
15
Wayanad By Election Result 2024: प्रियांका गांधींची विजयाच्या दिशेने कूच! पहा आकडेवारी
16
Mankhurd Shivaji Nagar Vidhan Sabha Election Result 2024 : नवाब मलिक पराभवाच्या छायेत?; राष्ट्रवादी २४ हजार मतांनी पिछाडीवर
17
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजपाची शतकी खेळी, शिंदेसेनेची हाफ सेंच्युरी; मविआची पिछेहाट, महायुतीची मुसंडी
18
Karad North Vidhan Sabha Election Result 2024 Live : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड; शरद पवारांचा शिलेदार ७३४४ मतांनी पिछाडीवर
19
Maharashtra Assembly Election 2024 Result : आशिष शेलारांच्या भावाकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार अस्लम शेख यांना टफ फाईट, सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: हाय व्होल्टेज लढतीत शरद पवारांचे पाच शिलेदार पिछाडीवर

चंद्रपूर : आकाशातून कोसळलेले ‘ते’ तुकडे चिनी उपग्रहाचे, अखेर इस्त्रोचे शिक्कामोर्तब

By राजेश मडावी | Published: April 05, 2023 2:37 PM

केंद्र सरकारकडे सादर केला अहवाल.

चंद्रपूर : वर्षभरापूर्वी जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी परिसर व विविध वेगवेगळ्या ठिकाणी अवकाशातून कोसळलेले रिंग व सिलिंडर हे चीनच्या लाँगमार्च सॅटेलाईटचे तुकडे असल्याचे इस्त्रो व अमेरिकेच्या चंद्रा ऑब्जवेर्टी या संस्थेने शिक्कामोर्तब केले. इस्त्रोने या बाबतचा अहवाल केंद्र सरकारकडे सोपविला आहे. २ एप्रिल २०२२ रोजी उघडकीस आलेल्या या घटनेला एक वर्षाचा कालावधी झाला आहे.   राज्याच्या विविध भागात आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात २ एप्रिल २०२२ रोजी रात्री  ८. ३० वाजता च्या सुमारास एक मोठी रिंग व फुटबॉलच्या आकाराचा सिलिंडर अवकाशातून कोसळला होता. या घटनेला अनेकांनी कॅमेऱ्यात कैद करून व्हायरल केल्याने मोठी चर्चा झाली होती. लाडबोरी येथे रिंग व सिलेंडर कोसळल्याची माहिती सिंदेवाही पोलिसांना मिळताच त्यांनी गावात जावून घटनेची पहाणी करून अवकाशातून कोसळलेल्या वस्तू ताब्यात घेतल्या होत्या.पोलीस ठाण्यात त्याच रात्री जमा करण्यात आल्या. त्यानंतर त्याच रात्री कोसळलेले फुटबॉलच्या आकाराचे साहित्य ब्रम्हपूरी, चिमूर व सिंदेवाहीच्या अनेक भागात आढळून आले. त्या वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या. या घटनेची दहशत निर्माण झाल्याने तत्कालिन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व स्कायवॉच गृपचे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी इस्त्रोकडे या बाबत चौकशीची मागणी केली होती. १५ एप्रिल २०२२ रोजी इस्त्रोचे दोन वैज्ञानिक एम. शहाजहान, मयूरेश शेट्टी व स्कॉयवॉच गृपचे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी लाडबोरी गावाची पाहणी व नागरिकांशी चर्चा केली. सिंदेवाही पोलीस ठाण्यात ठेवलेल्या त्या वस्तूंचे निरीक्षण करून त्या अवकाशी वस्तू निरीक्षणाकरता पाठविण्यात आल्या होत्या. 

काय आहे निष्कर्ष ?इस्त्रोने त्या अवकाशीय वस्तूंचे निरीक्षण केले असता चीनच्या लाँगमार्च सॅटेलाईचे ते तुकडे असल्याचे निष्पन्न झाले आहे. चीन देशाने लाँगमार्च हा उपग्रह अवकाशात सोडला होता. हा उपग्रह बंगालच्या खाडीत पडणे अपेक्षित होते. परंतु उपग्रहाचे तुकडे समुद्रात न पडता विविध देशांसह महाराष्ट्रातील चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागात कोसळले. 

नासाची एक संस्था असलेल्या ऑब्जवेर्टी संस्थेचे शास्त्रज्ञ जॉन्सॉन मॅक्डेएल यांनी व इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, चंद्रपूर व अन्य ठिकाणी कोसळलेल्या अवकाशीय वस्तू चीनच्या लाँगमार्च उपग्रहाचेच तुकडे आहेत. याबाबत जॉन्सॉन मॅक्डेएल यांच्याशी माझा पत्रव्यवहार झाला आहे. त्यामुळे भारत सरकार भविष्यात या घटनेबाबत कार्यवाही करते, याकडे लक्ष आहे.प्रा. सुरेश चोपणे, खगोल अभ्यासक स्कायवॉच गृप, चंद्रपूर

टॅग्स :isroइस्रो