चंद्रपूर - सावली वनपरीक्षेत्रातर्गत येणाऱ्या व्याहाड ( खुर्द ) उपवन परिक्षेत्रातील सामदा बुज. वन बीटात कंपार्टमेंट नंबर २०१ मधील रामदास देवतळे सामदा बुज यांच्या अतिक्रमित शेतात सोमवार दि.25 रोजी सकाळी वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती वनविभागाला मिळताच सावली वनपरीक्षेत्राचे प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी राजूरकर आणि व्याहाड खुर्द उपवन क्षेत्राचे अतिरिक्त क्षेत्र सहाय्यक आर. जी. कोडापे व त्यांच्या चमुने घटनास्थळ गाठून वाघाच्या मृतदेहास ताब्यात शवविच्छेदनासाठी रवाना केले. शवविच्छेदनानंतर वाघाचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती मिळेल, अशी माहिती वनविभागाने दिली.
मृतावस्थेत आढळून आलेले वाघाचे शवसडलेल्या अवस्थेत आहे. कदाचित या वाघाचा मृत्यू तीनचार दिवसापूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दीड महिन्यात सात वाघांचा मृत्यू
14 नोव्हेंबर - चिमूर वनपरिक्षेत्र- झुंजीत मृत्यू18 नोव्हेंबर -ताडोबा - नैसर्गिकरित्या10 डिसेंबर - वरोरा वनपरिक्षेत्र-अपघात14 डिसेंबर - पळसगाव वनपरिक्षेत्र-नैसर्गिकरित्या21 डिसेंबर-सिंदेवाही वनपरिक्षेत्र- विद्युत करंट24 डिसेंबर - तळोधी वनपरिक्षेत्र- विहिरीत पडून25 डिसेंबर - सावली वनपरिक्षेत्र - कारण अस्पष्ट.