लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेने २ आॅक्टोंबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरु केलेल्या हागणदारीमुक्त उपक्रमाला यश येत आहे. जिल्ह्यात केवळ १७६ कुटुंबांकडेच शौचालय नाही. हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या देशातील जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर अग्रेसर आहे. स्वच्छता दर्पण अनुक्रमणिकेत चंद्रपूरला भारतात पहिले स्थान मिळाले आहे.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र शासनाने संपूर्ण जिल्हे गोदरीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी देशभरातील जिल्हयांचे स्वच्छता दर्पण रँकींग देण्यात येत आहे. यात देशात आदिवासीबहुल व मागास समजल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. या जिल्ह्याला ६९.११ टक्के गुण मिळाले. केंद्र शासनाने केलेल्या मुल्यांकनात महा
स्वच्छता दर्पण अनुक्रमणिकेत चंद्रपूर देशात पहिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 1:57 PM
हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या देशातील जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर अग्रेसर आहे. स्वच्छता दर्पण अनुक्रमणिकेत चंद्रपूरला भारतात पहिले स्थान मिळाले आहे.
ठळक मुद्देजानेवारीअखेरपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त होणार