शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे चंद्रपूरकर वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 6:00 AM

उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे चंद्रपूर शहराच्या पाणी पुरवठ्याचे कंत्राट गेल्यापासून शहरातील पाणी पुरवठा अनियमित झाला आहे. इरई धरणामध्ये पाण्याचा मुबलक साठा असतानासुद्धा शहरातील अनेक भागात नियमित पाणी पुरवठा होत नाही. ज्या भागात सुस्थितीत पाणी पुरवठ्याची लाईन आहे, तिथेही नियमित पाणी पुरवठा होत नाही.

ठळक मुद्देअखेर मनपाने भरले देयक : थकीत वीज बिलामुळे पाणी पुरवठा बंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या पाणीपुरवठ्याचे कंत्राट असलेल्या उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीने मागील तीन महिन्यांपासूनचे सुमारे १ कोटी ६० लाख रुपयांचे वीज बिल विहीत मुदतीत भरले नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीने बुधवारी दुपारी इरई धरणावरील पाणीपुरवठ्याची वीज खंडित केली. परिणाम गुरुवारी संपूर्ण चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा होऊ शकला नाही. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे धरणात मुबलक पाणी असतानाही पाण्यासाठी भटकंती करावी लागली.विशेष म्हणजे, वीज बिल जोपर्यंत अदा केले जाणार नाही, तोपर्यंत पंपहाऊसचा वीज पुरवठा पूर्ववत सुरू केला जाणार नाही, अशी भूमिका वीज वितरण कंपनीने घेतली. त्यामुळे चंद्रपूरकरांना आणखी किती दिवस पाणी मिळणार नाही, हे सांगणे कठीण झाले होते. दरम्यान, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून अखेर महानगरपालिकेनेच गुरुवारी दुपारी थकित वीज बिलाचा भरणा केल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे चंद्रपूर शहराच्या पाणी पुरवठ्याचे कंत्राट गेल्यापासून शहरातील पाणी पुरवठा अनियमित झाला आहे. इरई धरणामध्ये पाण्याचा मुबलक साठा असतानासुद्धा शहरातील अनेक भागात नियमित पाणी पुरवठा होत नाही. ज्या भागात सुस्थितीत पाणी पुरवठ्याची लाईन आहे, तिथेही नियमित पाणी पुरवठा होत नाही. वीजबिल अधिक भरावे लागू नये म्हणून कंत्राटदाराकडून इरई धरणावरील पंप नियमित सुरु केला जात नाही. पाण्याची उचलच कमी केली जाते. त्यामुळे पाणीपुरवठा होत नाही. या प्रकारामुळे चंद्रपूर मागील अनेक वर्षांपासून पाणी पुरवठ्याबाबत त्रस्त आहेत.आता तर कंत्राटदाराने हद्दच केली आहे. मागील तीन महिन्यांपासून इरई धरणावरील पंपहाऊसचे वीज बिल थकित ठेवले. थकित बिलाची रक्कम आता १ कोटी ६० लाख रुपये एवढी आहे. तीन महिन्यांचे वीज बिल थकीत असल्यामुळे प्रकरण अंगलट येणार, असे दिसताच वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या आदल्या दिवशी वीज कापण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ऐन दिवाळीत नागरिकांना पाणी मिळाले नाही तर प्रचंड रोष निर्माण होईल. त्यामुळे वीज खंडित करण्यात येवू नये, अशी विंनती महानगरपालिकेतील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी केली होती. त्यामुळे वीज कापण्यात आली नव्हती. दिवाळी संपून आठवडा होताच वीज बिल भरण्यात न आल्यामुळे अखेर वीज वितरण कंपनीने बुधवारी दुपारी इरई धरणावरील पंपहाऊसचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाºया टाक्या भरू शकल्या नाही. त्यामुळे गुरुवारी शहराला पाणी पुरवठा होऊ शकला नाही. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे चंद्रपूरकरांना गरज नसताना गुरुवारी दिवसभर पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागली.विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून चंद्रपुरातील अनेक भागात दूषित व गढूळ पाणी पुरवठा होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी झाल्यानंतरही कंत्राटदार याकडे लक्ष द्यायला तयार नाही.आता महापालिका करणार पैसे वसूलकंत्राटदाराने एक कोटी ६० लाखांचे थकित वीज तत्काळ भरावे, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने विनंती केली. प्रसंगी दबावही टाकला. मात्र कंत्राटदार योगेश समरित वीज बील भरण्यास तयार झाले नाही. त्यामुळे आता अनिश्चित काळासाठी शहरात पाणी पुरवठा होणार नाही, असे दिसू लागल्याने महानगरपालिकेनेच पुढाकार घेत कंत्राटदार योगेश समरित यांच्याकडे थकित असलेले वीज देयक गुरुवारी दुपारी भरले. त्यामुळे वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला. आता भरलेले वीज देयकाची रक्कम मनपा कंत्राटदाराकडून कशी वसूल करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कंत्राटदाराचा वीज वाचविण्याचाच वारंवार प्रयत्नशहरात काही ठळक कारण नसताना अनेक वेळा अनियमित पाणी पुरवठा केला जाते. वीज वाचविण्यासाठीच कंत्राटदार असा प्रकार करीत असावे, असे आता बोलले जात आहे. याशिवाय पाणी टंचाईमुळे उन्हाळ्यात सुरू करण्यात आलेला एक दिवसाआड पाणी पुरवठा सदर कंत्राटदाराने काहीही कारण नसताना पावसाळ्यापर्यंत अधेमधे सुरूच ठेवला होता. यातून उज्ज्वल कंस्ट्रक्शनने वीज बिज वाचवून नागरिकांना त्रास दिला.कंत्राटदाराने वीज देयक अदा केले नाही. त्यामुळे पंपहाऊसचा वीज पुरवठा खंडित झाला होता. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महानगरपालिकेनेच दुपारी वीज देयक अदा केले. आता वीज पुरवठा सुरळीत झाला असून पाण्याच्या टाक्या भरणे सुरू आहे. गुरुवारी रात्री उशिरा नागरिकांना नळाद्वारे पाणी देण्यात येईल. शुक्रवारपासून शहरात सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल.- अंजली घोटेकर,महापौर, मनपा चंद्रपूर.

टॅग्स :Waterपाणीelectricityवीज