लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरासह लगतच्या दाताळा कोसारा भागात मागील काही दिवसांपासून बेवारस श्वानांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. या बेवारस श्वानांचा बंदोबस्त करण्याकडे महापालिका व संबंधीत ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.दिवसा-रात्री हे श्वान मुख्य रस्त्यासह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहनधारक आणि पादचाऱ्यांचा पाठलाग करतात. या पालिकेच्या हद्दीतील रात्री उशिरापर्यंत आणि सकाळी श्वानांचे कळप हैदोस घालताना दिसतात. यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना घराबाहेर पडणेदेखील अवघड झाले आहे. यामुळे शहरालगतच्या ग्रामीण भागात पिसाळलेल्या श्वानांनी आजवर अनेकांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र बंदोबस्त करण्याकडे संबंधीतांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिक भीतीयुक्त वातावरणात वास्तव्य करीत आहेत. या महानगरपालिका या समस्येची दखल न घेतल्यास बेवारस श्वानांमुळे मोठी दुर्घटना होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.विद्यार्थी दहशतीतबेवारस श्वानांची संख्या प्रचंड वाढली असून पहाटे शाळा आणि शिकवणी वर्गाला जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनी, मॉर्निंग वॉककरिता जाणाºया नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबधीतांनी तातडीने या बेवारस श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
मोकाट कुत्र्यांमुळे चंद्रपुरकरांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 12:52 AM
दिवसा-रात्री हे श्वान मुख्य रस्त्यासह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहनधारक आणि पादचाऱ्यांचा पाठलाग करतात. या पालिकेच्या हद्दीतील रात्री उशिरापर्यंत आणि सकाळी श्वानांचे कळप हैदोस घालताना दिसतात. यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना घराबाहेर पडणेदेखील अवघड झाले आहे. यामुळे शहरालगतच्या ग्रामीण भागात पिसाळलेल्या श्वानांनी आजवर अनेकांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत.
ठळक मुद्देभीतीयुक्त वातावरण : बंदोबस्त करण्याकडे मनपाचे दुर्लक्ष