शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
4
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
5
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
6
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
8
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
9
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
10
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
11
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
12
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
13
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
14
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
15
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
16
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
17
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
18
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
19
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
20
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!

दारूबंदीमुळे चंद्रपूरकरांची ८७ कोटींची थेट बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 11:25 PM

चंद्रपूर जिल्हा दारूबंदी झाल्यानंतरच्या परिणामाचे पावर पॉइंट प्रेझेंटेशन करताना या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग म्हणाले, चंद्रपूरमध्ये दारूबंदी झाल्यामुळे वार्षिक जवळपास ८७ कोटी रुपये सरळ सरळ लोकांच्या खिशात वाचले. त्यामुळे चंद्रपूरसाठी दारूबंदी म्हणजे लोकांच्या खिशात डायरेक्ट कॅश ट्रान्सफर योजना आहे, याकडेही डॉ. बंग यांनी यावेळी लक्ष वेधले.

ठळक मुद्देअभय बंग : व्यसनमुक्ती दिंडीने वेधले नागरिकांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा दारूबंदी झाल्यानंतरच्या परिणामाचे पावर पॉइंट प्रेझेंटेशन करताना या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग म्हणाले, चंद्रपूरमध्ये दारूबंदी झाल्यामुळे वार्षिक जवळपास ८७ कोटी रुपये सरळ सरळ लोकांच्या खिशात वाचले. त्यामुळे चंद्रपूरसाठी दारूबंदी म्हणजे लोकांच्या खिशात डायरेक्ट कॅश ट्रान्सफर योजना आहे, याकडेही डॉ. बंग यांनी यावेळी लक्ष वेधले.चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या तीन जिल्ह्यांमध्ये दारूबंदी केल्यानंतर झालेल्या सामाजिक परिवर्तनाची आकडेवारीसह माहिती देताना दारू व तंबाखू हे नवे कॉलरा-प्लेग आहे. गुजरात राज्याने गेल्या सत्तर वर्षांमध्ये दारूबंदी केल्यानंतरही विकासामध्ये आगेकूच कायम ठेवली आहे. त्यामुळे दारूबंदीमुळे विकासावर परिणाम होतो हे चुकीचे असल्याचेही डॉ. बंग यांनी स्पष्ट केले. गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुक्तीपथ प्रयोगाबाबतही डॉ. बंग यांनी यावेळी माहिती दिली. संमेलनात सिने अभिनेत्री अनिता दाते केळकर यांनी देखील यावेळी उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ गायकवाड यांनी केले. संमेलनाला राज्यातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, व्यसनमुक्तीसाठी कार्य करणारे कार्यकर्ते, लेखक, शाळा व महाविद्यालयाील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला दारू समर्थकांचा खरपूस समाचारचंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केल्यानंतर दारू माफियांसह विक्रेत्यांकडून उलटसुलट तर्क लावण्याचे काम सातत्याने सुरू आहे. यावर ना. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे निमित्त साधून दारूविक्रीचे समर्थन करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. ना. मुनगंटीवार म्हणाले, व्यसनमुक्ती समाज निर्माण करणे हे ईश्वरीय कार्य आहे. चंद्रपूरात विषारी दारू मिळते, असा तर्क काही मंडळी लावत आहे. मुंबई, कोकणमध्ये दारूबंदी नसतानाही विषारी दारू काढल्या जाते. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तर्क लावणाºयांनी आपल्या घरात जन्मलेल्या मुलाला ग्राईप वॉटरऐवजी एक चमच व्हिस्की पाजावी, नाही तर एक चमक बॅण्डी पाजावी. मात्र त्यांनी स्वत:ची मुले व्यसनमुक्त व्हावे, असे वाटते. तसाच दुसºयांची मुलेही व्यसनमुक्त व्हावी याचा विचारही त्यांनी करावा. दारूबंदी केली. ती पूर्ण बंद होण्यासाठी काही कालावधी लागेल. दारुबंदी केल्यानंतर दारूविक्रेत्यांनी धमक्या दिल्या होत्या. ते राजकारणात हारविण्याची भाषा करतात. राजकारणात ते हारवू शकतील. पण दारूबंदी करून दारूसाठी आई-वडिलाचा, पत्नीचा, मुला-मुलीचा खून या घटना बंद झाल्या आहेत. अनेक उद्ध्वस्त होणारी कुटुंब वाचवून जीवनाची लढाई जिंकल्याचा आनंद आहे, या शब्दात त्यांनी दारूबंदीचे समर्थन करणाºयांवर हल्ला चढविला. सोबतच त्यांनी आपली दारूबंदीविषयीची भूमिका मजबूत असल्याचे पुन्हा एकवार ठासून सांगितले.१ टक्का अबकारी कर व्यसनमुक्तीसाठी खर्च करणारचंद्रपूरमधील दारूबंदी ही जनतेसाठी डायरेक्ट कॅश ट्रॉन्सफर योजनाचंद्रपूरमध्ये ७ व्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटनतज्ज्ञांचे विविध विषयांवर मार्गदर्शनशाळा व महाविद्यालयाच्या हजारो विद्यार्थ्यांचा सहभागव्यसनाधीनता सोडविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या स्टॉलवर गर्दीराष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान