शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

किल्ला पर्यटनाला चंद्रपूरकरांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 11:17 PM

इको-प्रोतर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून चंद्रपूर किल्ला पर्यटनासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत भल्या पहाटे किल्ला पर्यटन-हेरीटेज वॉकमध्ये सहभाग घेतला.

ठळक मुद्देइको-प्रोचे आवाहन : हेरिटेज वॉकमध्ये शेकडो नागरिक सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इको-प्रोतर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून चंद्रपूर किल्ला पर्यटनासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत भल्या पहाटे किल्ला पर्यटन-हेरीटेज वॉकमध्ये सहभाग घेतला.१ मार्च २०१७ पासून सुरू असलेल्या चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियानाला ४४६ दिवस पूर्ण झाले. किल्ला स्वच्छता अभियान सोबतच दुसऱ्या टप्पाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे चंद्रपूर किल्ला पर्यटनास चालना देण्यासाठी ‘हेरीटेज वॉक’ सारख्या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चंद्रपूर किल्ला स्वच्छतेचे अभियान अंतीम टप्पात आलेले असताना आता इको-प्रोच्या वतीने नागरिकांत जनजागृती व्हावी, आपला ऐतिहासिक वारसा जवळून पाहावा, इतिहास जाणून घेता यावा, पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा, चंद्रपूर शहराची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.सोशल मीडियावरून येथे ‘हेरीटेज वॉक’साठी येण्याचे आवाहन करण्यात आले होते. विशेष म्हणजे हेरीटेज वॉक मध्ये सहभागी होण्यासाठी पहाटे ५.३० वाजता दाखल होत नागरिकांनी किल्ला पर्यटनासाठी उत्साह दाखविला. सध्या कुठलीही विशेष तयारी न करता, आहे त्या परिस्थितीत किल्ला पर्यटन सुरू करण्यात आले आहे. तरीही नागरिकांच्या प्रतिक्रिया उत्साहवर्धक आहेत. याकडे हवे तसे लक्ष पुरातत्व विभाग व प्रशासनाने दिल्यास किल्ला पर्यटन विकास योग्य पद्धतीने करणे सोईचे होणार, असे इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी म्हटले आहे. सहभागी झालेल्या नागरिकांना चंद्रपूरच्या वैभवशाली गोंडराजाचा इतिहास, ऐतिहासिक वास्तुची माहिती, मंदिराची माहिती तसेच किल्लाचा इतिहास सांगून किल्लाची दुरवस्था आणि राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानाची माहिती देण्यात येत आहे. त्यांनतर किल्लावरून फेरफटका मारत माहीती देण्यात आली.