लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चंद्रपूरकरांना सूर्याने भाजून काढले आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील प्रत्येक शहर होरपळून निघत आहे. आज बुधवारी सूर्याचा पारा थेट ४८ अंशावर स्थिरावला. दरम्यान, वरोऱ्यातील एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.चंद्रपुरात मागील काही दिवसांपासून सूर्याने तांडव सुरू केले आहे. सतत पारा ४६ अंशापार जात आहे. मंगळवारी तर ४७.८ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली. हे तापमान राज्यात सर्वाधिक ठरले आहे. आज बुधवारी पुन्हा सूर्याने कहर केला. आज ४८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमानदेखील राज्यात सर्वाधिक ठरले आहे. दरम्यान, वरोरा शहरातील रत्नमाला चौकातून चंद्रपूरकडे जाण्याकरिता उभे असलेल्या प्रवाश्यांकरिता प्रवासी शेड उभारण्यात आले आहे. या प्रवाशी शेडमध्ये एक ५० वर्षीय महिला झोपून असल्याचे शेजारील दुकानदारांच्या लक्षात आले. महिला भरदुपारी उन्हात निपचित पडून असल्याची माहिती वरोरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी उपजिल्हा रूग्णालयात महिलेला नेले असता उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. मृत महिलेने साडी परिधान केली होती. वरोरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून सदर महिलेचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे निष्पन्न झाले.
चंद्रपूरचे तापमान राज्यात सर्वाधिक; ४८ अंश सेल्सिअस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 9:41 PM
मागील काही दिवसांपासून चंद्रपूरकरांना सूर्याने भाजून काढले आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील प्रत्येक शहर होरपळून निघत आहे. आज बुधवारी सूर्याचा पारा थेट ४८ अंशावर स्थिरावला.
ठळक मुद्देउष्माघाताने महिलेचा मृत्यू