शेकडो नागरिकांचा सहभाग : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समितीचा पुढाकारचंद्रपूर : २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पं. पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताचे संविधान, संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केले. याच ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समिती, चंद्रपूरच्या वतीने संविधान सन्मान दिनानिमीत्य चंद्रपुरातून गुरूवारी संविधान सन्मान रॅली काढली. या रॅलीत अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांसह शहरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.सकाळी ८ वाजता समता सैनिक दल यांच्या मार्गदर्शनात चंद्रपुरातील मुख्य मार्गावरुन आंबेडकरी युवकांची बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व प्रतीक डोर्लीकर, राजस खोब्रागडे, सूरज कदम, स्नेहल रामटेके, त्रिरत्न मुन, वैभव रामटेके, आशिष कीर्तक आदींनी केले. राष्ट्रध्वज घेवून बाईक रॅली काढण्यात आली. संविधान सन्मान रॅलीसाठी राष्ट्रवादी सेक्युरिटी फोर्स प्राय. लिमीटेडचे संचालक सोमेश्वर येलचलवार यांनी वाहतुकीवर निमंत्रणासाठी आपले २५ सुरक्षा रक्षक मोफत उपलब्ध करून दिले. दुपारी १ वाजता संविधान रॅलीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा पोलीस अधिक्षक संदिप दिवान, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, तसेच महावितरणच्या कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार यांच्या हस्ते राष्ट्रध्वज उचलून रॅलीची सुरवात करण्यात आली. यावेळी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव समितीचे मुख्य संयोजक प्रवीण खोब्रागडे यांनी भूषविले. संचालन विशाल अलोणे यांनी तर प्रास्ताविक प्रतीक डोर्लीकर यांनी केले. आभार राजेश वनकर यांनी मानले.रॅलीच्या यशस्वीतेकरीता व्ही.डी. मेश्राम, खुशाल तेलंग, सत्यजीत खोब्रागडे, एस.टी. चिकटे, राजु खोब्रागडे, नितीन रामटेके, वामन सरदार, हरीश दुर्योधन, अ.वी. टेंभरे, कोमल खोब्रागडे, बाजीराव उंदीरवाडे, शेषराव सहारे, अशोक फुलझेले, महादेव कांबळे, इ.एस. मेश्राम, राजकुमार जवादे, सिध्दार्थ वाघमारे, रवि मुन, प्रेमदास बोरकर, राजू कीर्तक, तेजराज भगत, रामजी जुनघरे, तथागत पेटकर, मनोज भैसारे यांनी परीश्रम घेतले.(स्थानिक प्रतिनिधी)संविधान हा अमूल्य ठेवासंविधान सन्मान रॅलीनंतर झालेल्या मुख्य कार्यक्रमामध्ये डॉ. ए. पी. पील्लई यांनी संविधानातील विविध तरतुदी विषयी मार्गदर्शन करताना संविधान भारतासाठी अमुल्य ठेवा आहे, असे प्रतिपादन केले. भारतीय संविधान समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या तत्वावर आधारीत आहे व प्रत्येक भारतीयांसाठी संविधानाच्या तरतुदी असून भारताच्या एकात व अखंडतेसाठी प्रेरक असल्याचे नागपूरवरुन आलेले प्रमुख वक्ते अॅड. संदेश भालेकर यांनी सांगितले.
संविधान सन्मान रॅलीने चंद्रपूरनगरी दुमदुमली
By admin | Published: November 27, 2015 1:18 AM