लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वस्त धान्य दुकानातून बीपीएल, एपीएलधारकांना दर महिन्यात ३५ किलो धान्य देण्याचा नियम आहे. मात्र, या नियमाला डावलून किटाळीत स्वस्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांना केवळ २५ किलोच धान्य दिले जात आहे. मात्र राशन कॉर्डवर ३५ किलो धान्याची नोंद करण्यात येत आहे. त्यामुळे स्वास्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांची लूट होत असल्यामुळे किटाळीतील लाभार्थ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.चंद्रपूर तालुक्यातील किटाळी गावची लोकसंख्या हजार ते बाराशेच्या जवळपास आहे. या गावातील २५ टक्के नागरिक शेती तर ७५ टक्के लोक मजुरी करून आपले कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतात. गावातील बीपीएल, एपीएल आणि प्राधान्यक्रमाने कुटुंबीयांना गहू, तांदूळ आणि साखर देण्याचे काम स्वस्त धान्य दुकानदार नमू शेंडे यांच्याकडे आहे. गावात अंत्योदयचे ९०, एपीएलचे ४० आणि प्राधान्यप्रमाणे कुटुंबीयांना लाभ, यांचे शेकडो लाभार्थी आहेत. अंत्योदय लाभार्थ्यांना ३५ किलो तर प्राधान्यक्रमाने कुटुंबीयांना लाभानुसार प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य देण्याचा नियम आहे. मात्र किटाळीतील स्वस्त धान्य दुकानदार कधीच पूर्णपणे धान्य देत नाही. केवळ २५ किलो धान्य देतो. मात्र रेशन कॉर्डवर ३५ किलो धान्य दिल्याची नोंद करतो. गहू दोन रुपये तर तांदूळ तीन रुपये किलोने लाभार्थ्यांना देण्याचा नियम आहे. मात्र अवाजवी दराने धान्य स्वस्त दुकानदार लाभार्थ्यांना देत आहे. अनेकांना तर तो धान्य देत नाही. धान्य संपले असे सांगून त्यांना घरी पाठवितो. याबाबत पुरवठा विभागाकडे दोनदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही.त्यामुळे किटाळी येथील लाभार्थ्यांनी सोमवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. तसेच आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी सरपंच बाबूराव ठाकरे, माजी सरपंच सदाशिव तुराणकर, शीला आत्राम, ममता रायपूरे, आवडता रामटेके, अनिता दुधकोर, कल्पना अलोणे, मीना ठाकरे, कांता अलोणे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाºयांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन गावकºयांना दिले.
स्वस्त धान्य दुकानाविरुद्ध एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 1:52 AM
स्वस्त धान्य दुकानातून बीपीएल, एपीएलधारकांना दर महिन्यात ३५ किलो धान्य देण्याचा नियम आहे. मात्र, या नियमाला डावलून किटाळीत स्वस्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांना केवळ २५ किलोच धान्य दिले जात आहे.
ठळक मुद्देकिटाळीच्या नागरिकांची धडक : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन