शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
3
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
4
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
5
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
6
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
7
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
8
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
9
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
10
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
11
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
12
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
13
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
14
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
15
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
16
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
17
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
18
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
19
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
20
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष

वनव्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून फसवणूक

By admin | Published: September 25, 2016 1:13 AM

गावाच्या विकासासाठी व वनविभागाच्या अधिपत्याखाली स्थापन झालेल्या वनव्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष

पिपरी देशपांडे येथील घटना : लाभार्थ्यांचा पत्रकार परिषदेत आरोपमूल : गावाच्या विकासासाठी व वनविभागाच्या अधिपत्याखाली स्थापन झालेल्या वनव्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सचिवांनी गॅस सिलेंडरच्या शेकडो लाभार्थ्यांची फसवणूक केल्याचा आरोप पिपरी देशपांडे येथील अमित पाल व इतर लाभार्थ्यांनी पत्रकार परिषदेत केला.मूल येथील दर्पण सार्वजनिक वाचनालयामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत लाभार्थ्यांनी म्हटले की, पिपरी देशपांडे येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओमदास गणपती पाल व सचिव वनरक्षक एम.एन. गोंगले यांनी १२६ गॅस सिलेंडर लाभार्थ्यांकडून फेब्रुवारी २०१६ रोजी प्रति लाभार्थ्यांकडून दोन हजार ५५० रुपये वसूल केले. त्यानूसार एकूण तीन लाख २१ हजार ३०० जमा केले. परंतु अजूनही लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे वाटप केले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी कोठारी येथील वनविभागाशी संपर्क साधला असता, केवळ ४० लाभार्थ्यानाच गॅस सिलेंडर मंजूर झाल्याचे सांगितले या संदर्भात लाभार्थ्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी समितीने पैसेच जमा केले नसल्याचे उघडकीस आले. यावरुन वनव्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आणि सचिवांनी लाभार्थ्यांच्या पैश्याची अफरातफर केली असा आरोप अमित पाल व लाभार्थ्यांनी पत्रकारपरिषदेत केला. पिपरी देशपांडे येथील २ लाभार्थ्यांपैकी समितीने अनुसूचित जमाती तीन, अनुसूचित जाती २१ तर ओबीसीच्या ५५ लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे वाटप केलेले आहे. पिपरी देशपांडे येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या खाता पुस्तीकेत चार लाख २२ हजार २५ रुपये जमा असणे आवश्यक होते. परंतु खाता पुस्तीकेत दोन लाख ४३ हजार १५७ रुपये जमा आहेत. त्यामुळे अध्यक्ष ओमदास पाल व सचिव एम.एन. गोंगले यांनी एक लाख ७३ हजार ७०० रुपये अफरातफर केल्याचा आरोप लाभार्थ्यांनी यावेळी केला.या संदर्भात उपवनसंरक्षक हिरे, वनपरिक्षेत्राधिकारी कोठारी, पोलीस स्टेशन मूल येथे रितसर तक्रार दिलेली आहे. मात्र अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही समितीचे अध्यक्ष ओमदास पाल हे पोंभूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असून भाजपाचे महामंत्री आहे. त्यामुळेच त्यांच्यावर अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत कारवाई करीत नसल्याचा आरोपही लाभार्थ्यांनी केला. पत्रकार परिषदेला अमीत पाल, नितीन पाल, प्रशांत आरेकर, सुनील बावणे, एकनाथ पाल, प्रफुल मशाखेत्री, मुखरू पाल, प्रदीप खरबनकर, कपीलदास मशाखेत्री,शिवकुमार पाल उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)पैसे घेऊनही पावती दिली नाही.गॅस सिलेंडर लाभार्थ्यांना एक हजार २७५ रुपये भरायचे होते. मात्र समितीच्या अध्यक्ष आणि सचिवांनी लाभार्थ्याकडून दोन हजार ५५० रुपये घेतले. व त्याची पावतीसुद्धा दिली नाही. अजुनही १२६ लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे वाटप केलेले नाही.२०५ लाभार्थ्यांकडून जमा केलेल्या दोन हजार ५५० रुपये प्रमाणे पाच लाख २२ हजार ७५० रुपये संयुक्त वनव्यस्थापन समितीच्या खात्यामध्ये जमा असायला पाहिजे होते. परंतु समितीने तीन लाख ४९ हजार ५० रुपये भरले. व त्यापैकी ७९ गॅस सिलेंडरचे एक लाख ७२५ रुपये गॅस एजन्सीमध्ये भरले. त्यामुळे बँक खाता पुस्तीकेत केवळ दोन लाख ४३ हजार १५७ रुपये जमा आहेत.