शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण, सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली भावना

By राजेश भोजेकर | Published: October 02, 2023 9:38 AM

Sudhir Mungantiwar: छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि आता त्यांनी वापरलेल्या वाघनखांबाबत शंका उपस्थित करणे दुर्दैवी असून; जेव्हा ब्रिटेनशी प्रत्यक्ष करार करण्याची वेळ आली त्याच वेळी केवळ जनतेच्या मनांत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न  सुरू आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

- राजेश भोजेकरचंद्रपूर - छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा कोथळा वाघनखांनी बाहेर काढला हे आपण लहानपणापासून शिकलो आहोत; ऐकत आलो आहोत. ती वाघनखे ३५० व्या राज्याभिषेक वर्षात शिवप्रेमींच्या दर्शनाला भारतात आणण्याच्या दृष्टीने करार करण्यास लंडन येथे जाताना खूप अभिमान वाटतो आहे, असे भावोद्गार राज्याचे सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. लंडन येथे रवाना होण्यापूर्वी मुंबई  विमानतळ मार्गावरील छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर  मुनगंटीवार कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. आमदार पराग अळवणी, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चव्हाण, अमोल जाधव, विनीत गोरे, स्थानिक नगरसेविका यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

मुनगंटीवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पोहोचताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या, ढोल ताशांचा गजर आणि लेझिम पथकाने परिसर दणाणून सोडला. यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा  पवार यांच्या नेतृत्वात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहीती देत हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित रयतेचे राज्य महाराष्ट्राला देण्याचा संकल्प करुन काम करीत असल्याचे स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे, आमची प्रेरणा आहे त्यांच्या विचारसरणीला धरून केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार काम करीत आहे हे स्पष्ट केले. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि आता त्यांनी वापरलेल्या वाघनखांबाबत शंका उपस्थित करणे दुर्दैवी असून; जेव्हा ब्रिटेनशी प्रत्यक्ष करार करण्याची वेळ आली त्याच वेळी केवळ जनतेच्या मनांत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न  सुरू आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आमदार पराग अळवणी  यांनीही मनोगत व्यक्त करुन ना. सुधीर मुनगंटीवार यांना शुभेच्छा दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धकालीन शस्त्र असलेली ही  वाघनखे ब्रिटनच्या विक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम मधून भारतात परत आणण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी  ना. सुधीर मुनगंटीवार रवाना झाले आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे  ३५० वे वर्ष प्रारंभ होताच ही वाघनखे भारतात परत आणण्याचा संकल्प सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात केंद्र शासन तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. १५ एप्रिल २०२३ रोजी मुंबई येथे ब्रिटेनचे पश्चिम भारत उप उच्चायुक्त अँलेन गँमेल यांच्यासह ब्रिटन च्या राजकीय व द्विपक्षीय संबंध उपप्रमुख इमोगेन स्टोन यांच्यासोबत बैठक घेवून महाराष्ट्र शासनाने व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी पत्रव्यवहार सुरू केला होता. मंगळवारी 3 ऑक्टोबर रोजी व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम येथे भेट देऊन या संग्रहलायचे संचालक ट्रायस्टम हंट यांच्यासोबत त्यांची बैठक होईल व करारावर स्वक्षऱ्या होतील.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार