लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची समस्या व दुष्काळ निवारण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिलेत. त्यांनी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील सरपंचांशी थेट मंत्रालयातून संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी थेट संवाद साधल्याबद्दल सरपंच यांनी आनंद व्यक्त केला असून गावातील दुष्काळाच्या संदर्भातील समस्या लगेच सुटतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 'आॅडिओ ब्रीज सिस्टीम' मार्फत जिल्ह्यातील सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. टंचाई जाणवणाऱ्या भागातील नेमकी परिस्थिती काय आहे? प्रशासन कुठे मागे आहे? समस्या सोडविण्यासाठी काय करता येईल? याबाबत थेट सरपंचांशी संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला.गावागावातील नळ योजनेसंदर्भातील समस्या, पाण्याचे स्रोत असणाºया नद्यांची समस्या, विहिरी, विंधन विहिरींची समस्या, तसेच जिल्ह्यामध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याची समस्या, याबाबत सरपंचांनी आपले मत निर्भयपणे या संवादातून मांडले. जिल्ह्यातील नागभीड, चिमूर, सिंदेवाही, राजुरा, ब्रह्मपुरी तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई पुढे आली आहे. मात्र बहुतेक ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे पाणी पुरवठा खंडित आहे. जिल्ह्यांमध्ये आजमितीला एकही टँकर सुरू नाही. तथापि, पाईपलाईन फुटणे, नळ योजनेच्या विहिरीला पाणी नसणे, वीज देयके प्रलंबित असणे, रोजगार हमीच्या कामाची सुरुवात करणे, आदी समस्या यावेळी सरपंचांनी मांडल्या.
सरपंचांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:06 PM
चंद्रपूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची समस्या व दुष्काळ निवारण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिलेत. त्यांनी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील सरपंचांशी थेट मंत्रालयातून संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी थेट संवाद साधल्याबद्दल सरपंच यांनी आनंद व्यक्त केला असून गावातील दुष्काळाच्या संदर्भातील समस्या लगेच सुटतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
ठळक मुद्देदुष्काळावर उपाययोजना करण्याचे निर्देश