लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : अहमदनगर येथील १० वर्षीय मुलीला चाकूचा धाक दाखवून अमानुषपणे अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशा मागणीचे निवेदन पद्मशाली समाज सिंदेवाहीच्या वतीने तहसीलदार मार्फतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.अहमदनगर शहरातील तोफखाना भागातील १० वर्षीय मुलीवर याच परिसरात राहणारा आरोपी अफसर लतीफ सय्यद (२४) याने चाकूचा धाक दाखवून अमानुषपणे अत्याचार केला. सदर प्रकरणी पोलिसात तक्रार देऊन आरोपीला अटक करण्यात आली. मात्र सदर प्रकरण हे दाबण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र या प्रकरणाला पद्मशाली समाज बांधवांनी उचलून धरले असून त्या आरोपीला सहकार्य करणाºयांना अटक करण्यात यावी, तसेच आरोपीला फाशीची शिक्षा होईल, असा तपास करुन पीडित मुलीला योग्य न्याय द्यावा, सदर खटला जलदगती न्यायालयात चालवावा. नामांकित वकिलाची नियुक्ती करावी, पीडिताच्या कुटुंबियांना शासनाने २५ लाखांची सानुग्रह मदत करावी, पीडित मुलीचा शिक्षणाचा खर्च व भविष्यात तिला शासकीय नोकरी द्यावी, पीडित मुलीच्या कुटुंबीयांना पूर्णपणे संरक्षण देण्यात यावे आदी अनेक मागण्या समाजबांधवांनी केल्या आहेत. या मागणीचे निवेदन गुरुवारी सिंदेवाही येथील तहसीलदारांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.पद्मशाली समाजाचे अध्यक्ष उद्धव चिंदमवार, सचिव तुलसिदास तुम्मे, तसेच महिला अध्यक्ष पायल बैनलवार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सदर निवेदन दिले. यावेळी पद्मशाली फाऊंडेशनचे उपाध्यक्ष लोकेश परसावार, साईनाथ कुर्रेवार, अनुप श्रीरामवार, सुधीर कुडकेलवार, अमोल कुचनवार, अशोक तुम्मे, विवेक पेदूरवार, संदीप चेन्नूरवार, महेश तुम्मे, अमोल गुज्जेवार, प्रकाश चिंतलवार, राहुल बल्लेवार, संतोष संगमवार, माधुरी तुम्मे, अंजली बल्लेवार, अनुश्री श्रीरामवार, पल्लवी परसावार, लता बल्लेवार यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
‘त्या’ आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:34 AM
अहमदनगर येथील १० वर्षीय मुलीला चाकूचा धाक दाखवून अमानुषपणे अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशा मागणीचे निवेदन पद्मशाली समाज सिंदेवाहीच्या वतीने तहसीलदार मार्फतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
ठळक मुद्देपद्मशाली समाजाचे निवेदन : अहमदनगर येथील मुलीवर अत्याचार