आशिष घुमे ।लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : लॉकडाऊनमुळे अडलेल्या येथील एका कामगार माऊलीने काखेत लेकरू अन डोक्यावर संसाराचा राहटगाडगे घेऊन वाहनाच्या शोधात गावच्या दिशेने पायी निघाली होती. मात्र, स्थानिक स्वयंसेवकांनी पुन्हा त्यांच्या राहत्या ठिकाणावर नेऊन सोडल्याची घटना नुकतीच घडली.आईच्या कडेवर एक आणि दुसरी लेकरू पाठीमागे पायी चालत जात असल्याचे दृश्य अनेकांना चटका लावून गेले. दोन्ही सांजेला वितभर पोटाची भूक भागवता यावी, यासाठी शेकडो किलोमीटर अंतरावरील मध्य प्रदेशातून काही कामगारांचे कुटुंब कामानिमित्त शहरात आले होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे हे कुटुंबदेखील वरोऱ्यातच अडकले. लॉकडाऊनची धास्ती व गावातील हक्काचे छत असलेल्या घराची चाहुल लॉकडाऊनमध्ये फसलेल्या नागरिकांना स्वस्त बसू देत नाही. येथील आनंदवन चौकालगत राहणाºया एका कुटुंबाने गावाकडे पायी जाण्याचा प्रयत्न केला. डोक्यावर संसाराचे साहित्य व काखेत लेकरू घेऊन माऊली आणि तिचा पती जीवाची पर्वा न करता पायीच गावाला निघाले होते. मात्र शहरातील काही स्वयंसेवकांना हे दृश्य दिसताच त्यांनी या कुटुंबाला जिथे होते तिथेच नेऊन सोडले. पायी जाण्याच्या नादात काही अनर्थ घडू नये, हीच या स्वयंसेवकांची भावना होती. हे कुटुंब आता शहरातच सुरक्षित आहे.
काखेत लेकरू अन् डोक्यावर संसाराचे गाठोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 5:00 AM
आईच्या कडेवर एक आणि दुसरी लेकरू पाठीमागे पायी चालत जात असल्याचे दृश्य अनेकांना चटका लावून गेले. दोन्ही सांजेला वितभर पोटाची भूक भागवता यावी, यासाठी शेकडो किलोमीटर अंतरावरील मध्य प्रदेशातून काही कामगारांचे कुटुंब कामानिमित्त शहरात आले होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे हे कुटुंबदेखील वरोऱ्यातच अडकले.
ठळक मुद्देलॉकडाऊनचा फटका : गावाकडे निघालेल्या कुटुंबाला स्वयंसेवकांनी आणले परत