चंद्रपूर : दारू पिऊन पत्नीला मारहान केल्याने पत्नी घरून निघून गेल्याने निर्माण झालेला संताप आपल्या तीन वर्षीय मुलावर काढत आपल्या पोटच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना मूल तालुक्यातील राजोली येथे आज पहाटे ५ वाजता दरम्यान घडली. प्रियांशू असे मृत बालकाचे नाव असून गणेश विठ्ठल चौधरी(३१) असे आरोपी पित्याचे नाव आहे. आरोपी गणेश यांनी देखील चाकुचे वार करून स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला होता. सध्या मूल पोलिसांनी अटक करून मुलच्या उपजिल्हा रुग्णालयात त्याचेवर उपचार सुरू आहे.
मूल तालुक्यातील राजोली येथे गणेश विठ्ठल चौधरी हा पत्नी काजल आणि मुलासह राजोली येथे राहात होता. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तो दारु पिऊन पत्नीला मारहाण केल्याने ती घरून निघुन गेली होती.घरी स्वतः गणेश आणि मुलगा प्रियांशु होते. दरम्यान रविवार ९ एप्रिल च्या. पहाटे ५ वाजता दरम्यान दारुच्या नशेत मुलगा प्रियांशु याचा गळा दाबुन खुन केला. व स्वताच्या गळ्यावर चाकुने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दारुच्या आहारी गेलेल्या एका पित्याने पोटच्या मुलाची गळा दाबुन खुन केल्याची घटना वाऱ्यासारखी गावात पसरली. याबाब मूल पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक सुमित परतेकी हे आपल्या पोलिस ताफ्यासह राजोली येथे पोहचून कारवाई सूरू केली आहे. आरोपी गणेश विठ्ठल चौधरी हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने त्याला मुलच्या उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आरोपी पित्याविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखला करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुमित परतेकी व चमू करीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"