यावेळी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदू रणदिवे, प्रभाकर भोयर, प्रशांत समर्थ, महेंद्र करकाडे, अनिल साखरकर, विनोद सिडाम, मिलिंद खोब्रागडे, प्रभा चौथाले, विद्या बोबाटे, प्रशांत लाडवे, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, नायब तहसीलदार पवार, संवर्ग विकास अधिकारी, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. इंदूरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खोब्रागडे, तुषार शिंदे, पोलीस निरीक्षक राजपूत उपस्थित होते. आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशन या दोन ठिकाणी ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन व तालुक्यासाठी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार आहे. प्रशासनाने आरटीपीसीआर चाचणी केंद्रांची संख्या वाढवत चाचण्यांवर भर द्यावा, फलक, लाऊडस्पीकरद्वारे कोरोनाविरुद्ध जागृतीवर भर देण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. टेस्टिंग रिपोर्ट २४ तासाच्या आत मिळावे, लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी, कोविड केअर सेंटरमधील सुविधा उत्तम असाव्या, उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामधील रिक्त पदांची भरती करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
मूल येथे १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 4:31 AM