सिंदेवाही : शहरातील नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या विविध मोबाइल कंपनीचे टॉवर उभे आहेत. शाळा बंद असल्याने लहान मुले या टॉवरजवळ खेळत असतात. गुरुवारी अचानक लहान मुले उंच टॉवरवर चढले. त्यानंतर ते खालीही उतरले; मात्र हा खेळ अतिशय धोकादायक असून, पालकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
शहरात नगरपंचायत अंतर्गत विविध मोबाइल कंपनीचे मोठे उंच लोखंडी खांब उभे आहेत. काही टॉवर बंद असल्याने खेळण्याकरिता मुले टाॅवरजवळ जातात. शाळा बंद असल्याने खेळण्याचा मोह आवरत नसल्याने आनंद घेण्याकरिता गुरुवारी मुले चक्क उंच टॉवर चढले. सुदैवाने ते सुरक्षित उतरले; मात्र हा प्रकार धोकादायक आहे. पालकांनी खेळताना मुलांकडे दुर्लक्ष करू नये. मोबाइल टाॅवरचा वापर खेळण्याकरिता नाही, असे मुलांना समजावून सांगणे आवश्यक झाले आहे.
150721\img-20210709-wa0075.jpg
सिंदेवाहीत मुलांची टॉवरवर विरू गिरी अपघातास आमंत्रण: मुलांकडे खेळतांना दुर्लक्ष