चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. यामध्ये अनेकांना आजार झाला तर काहींचा बळीसुद्धा गेला. काही लहान बालकांनाही कोरोना संसर्गाने ग्रासले. सध्या रुग्णसंख्या कमी झाली असली तरी धोका मात्र कायम आहे. दरम्यान, कोरोनातून सावरलेल्या बालकांना एमएसआयसी म्हणजे, मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमची लागण होत आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात असे रुग्ण नसले तरी काळजी घेणे गरजेचे आहे.
कोरोचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यातच कोरोना होऊन गेल्यानंतर होणारा आजारदेखील वाढत आहेत. त्यामुळे कोरोनातून सावरलेल्यांनी तसेच ज्यांना कोरोना झाला नसेल अशा प्रत्येकांनी आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस होत असल्याचे समोर आले. त्यानंतर आरोग्य प्रशासनाने यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. मधुमेह तसेच इतर आजार असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची विशेष काळजी घेण्यात आली.
सध्या कोरोनाची लाट ओसरत आहे. त्यामुळे राज्य शासनाने आता अनलाॅकची प्रक्रियाही सुरू केली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या लाटेमध्ये लहान मुलांना जास्त प्रमाणात बाधा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, कोरोनातून बरे झालेल्या लहान मुलांना एमएसआयसी म्हणजेच मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमची लागण होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या बालकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यतज्ज्ञांनी केले आहे.
बाॅक्स
अशी आहे लक्षणे
मुलांना खूप ताप येणे, सर्दी, कफ होणे
सतत पोटात दुखणे, मळमळ, उलट्या होणे, होळे लाल होणे,
त्वचेवर लाल चट्टे येणे
बाॅक्स
ही घ्या काळजी
मुलांना मास्कशिवाय बाहेर पडू देऊ नका, कुठलेही लक्षण आढळल्यास तातडीने डाॅक्टरांचा सल्ला घ्या.
कोरोनातून बरे झालेल्या मुलांकडे विशेष लक्ष द्या.
स्वत:हून औषध घेऊ नका. एमएसआयसी आजाराचे सुरुवासीलाच निदान झाल्यास तो गंभीर होत नाही.
बाॅख्स
जिल्ह्यातील एकूण रुग्ण-८४६१८
कोरोनावर मात केलेले रुग्ण-८२५९१
उपचार घेत असलेले रुग्ण-५०३
एकूण मृत्यू-१५२४
--
कोट
कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे शासनाने प्रथम १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला गती देणे महत्त्वाचे आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी ट्रायल सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे लहान मुलांचेही लसीकरण केल्यास पुढील संभाव्य धोके टाळता येईल. एमएसआयसी आजाराचा सध्यातरी आपल्याकडे धोका नसल्याचे दिसून येत आहे.
-डाॅ.अभिलाषा गावतुरे
बालरोग तज्ज्ञ, चंद्रपूर