शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

लहान मुलांची तब्येत बिघडली, ओपीडीमध्ये तिप्पट वाढ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 5:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत असतानाच लहान मुलांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत असतानाच लहान मुलांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडीसह खासगी रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण दिसून येत आहेत. यामध्ये जीवघेण्या तापाचेसुद्ध रुग्ण असल्याने काळजी घेण्याचे आवाहन बालरोग तज्ज्ञांनी केले आहे.दरवर्षी पावसाळ्यात लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे दिसून येतात. मात्र मागील वर्षी आलेल्या कोरोनाने दहशत पसरली आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच डेंग्यू, मलेरिया, मेंदूज्वर आदी प्राणघातक तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी ओपीडीतसुद्धा रुग्न वाढले असल्याचे दिसून येते.

संशयितांची कोरोना चाचणी

- शासकीय किंवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी आलेली मुले संशयित आढळून आल्यास त्यांची कोरोना चाचणी करण्यात येते. - शक्यतो मोठ्या माणसांपासून लहान मुलांना कोरोना होण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन बालरोग तज्ज्ञांनी केले आहे.

डेंग्यू-मलेरियाची चाचणी

शासकीय रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयातील ओपीडीमध्ये येत असलेल्या लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, हगणवण, साधा ताप यासह डेंग्यू मलेरिया या जीवघेण्या आजारांची लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे संशयित लक्षणे असताच डॅाक्टरांकडून डेंग्यू, मलेरियाची चाचणी करावयास सांगितल्या जात आहे. सध्यास्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयात गर्दी दिसून येत आहे.

बालरोग तज्ज्ञ म्हणतात....

पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप आदी समस्या लहान मुलांना जाणवतच असतात. परंतु, आता डेंग्यू, मेंदूज्वर, मलेरिया अशी जीवघेणी आजाराचे रुग्णसुद्धा मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कुटुंबियांनी काळजी घेतली तरी प्रशासनाकडूनही या जीवघेण्या तापाचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजन करणे गरजेचे आहे. मेंदूज्वर हा अंत्यंत भयावह आहे. यामध्ये बाळ दगावण्याची किंवा वेळीच उपचार न झाल्यास मतीमंद होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचे लसीकरण गरजेचे आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून लहान मुलांना मेंदूज्वरांचे लसीकरण करण्यात येत आहे. परंतु, आपल्या जिल्ह्यात अशी कुठल्याही प्रकारची योजना राबविताना दिसून येत नाही. - डॅा. अभिलाषा गावतूरे, बालरोग तज्ज्ञ, चंद्रपूर

 

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यू