चंद्रपूर : कोरोना संकटामुळे यावर्षीही अद्यापही शाळा भरल्या नाहीत. माध्यमिकचे वर्ग भरविण्यासंदर्भात शासनस्तरावर विचार सुरु आहे; मात्र प्राथमिकचे वर्ग यावर्षीही भरतील अशी शक्यता तशी कमीच आहे. यावर्षीही विद्यार्थ्यांना घरीच अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देणे सध्यातरी गरजेचे झाले आहे.
शाळा नसल्याने विद्यार्थीही आता सैराट होत आहेत. त्यांना शिक्षकांचा धाक नसल्यामुळे अभ्यासापेक्षा ते घरातच खेळण्याला अधिक महत्त्व देत आहेत. त्यामुळे त्यांना आता अभ्यासाचा विसर पडत आहे. विशेष म्हणजे, माध्यमिकचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरु झाल्या आहेत. ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र असलेल्या गावात शाळा सुरू होणार आहेत; मात्र प्राथमिकच्या विद्यार्थ्यांसंदर्भात अजूनही कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे हे वर्षही विद्यार्थ्यांना घरीच काढावे लागणार आहे. विशेष म्हणजे, मागील दीड वर्षापासून शाळाच भरली नसल्याने काही विद्यार्थी तर अक्षर ओळखही विसरले आहेत.
बाॅक्स
अभ्यास टाळण्यासाठी कारणे अनेक
मुले मोबाईल, संगणक अथवा टॅबच्यासमोर व्यवस्थित बसत नाहीत.
ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू असताना स्थिरता नसते.
गृहपाठ नसल्याने अभ्यास करण्यास टाळाटाळ
मोबाईलमुळे जास्त वेळ वाया जात आहे.
अभ्यासाच्या वेळी डोळे दुखी, झोप येते, भूक लागण्याचे मुले कारणे देत आहेत.
बाॅक्स
पालकांनी घरातच घ्यावी शाळा
प्राथमिकच्या मुलांना ऑनलाईन अभ्यासक्रम तसा कठीणच आहे. पहिलीच्या मुलांना अक्षरओळख करून घेणे आवश्यक आहे. पालकांनी यासाठी मुलांना वेळ देणे महत्त्वाचे आहे. अडचण असल्यास शिक्षकांसोबत संपर्क साधावा. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळांकडून मोफत पुस्तके दिली जातात. त्यामुळे या पुस्तकांचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना घरच्या घरीच शिकविण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सराव होईल.
-शिक्षक तज्ज्ञ, चंद्रपूर
कोट
पालकांची अडचण वेगळीच
कोरोना संकटामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. काही शाळांनी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु केला आहे; मात्र गावात मोबाईल नेटवर्क नाही. काही पालकांकडे मोबाईल सुद्धा नाही. शेतीची कामे असल्यामुळे मुलांचा अभ्यास केव्हा घ्यायचा.
-संतोष जुनघरी
पालक
कोट
प्राथमिकच्या विद्यार्थ्यांचे वय कमी असते. त्यामुळे त्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम समजत नाही. प्रत्येकवेळी पालकांना त्यांच्यासोबत बसने होत नाही. ग्रामीण भागातील पालकांची तर अवस्था बिकट आहे.शेतात गेल्याशिवाय पर्याय नाही. कोरोनामुक्त गावात शाळा सुरु करणेच योग्य राहील.
-सुनील देवाळकर
पालक, चंद्रपूर
बाॅक्स
शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना आता अभ्यासाचा विसर पडत आहे. ऑनलाईन शिक्षणातून पाहिजे तसे शिक्षण होत नाही.
पाल्यासोबत पालकांनी बसून त्यांचा अभ्यासक्रम घ्यावा
पाठांतर करून घ्यावे, लहान बालकांना चित्र ओळख करून घेत त्यांना अभ्यासाबाबत आवड निर्माण करावी.
वर्गनिहाय विद्यार्थी
पहिली-
दुसरी-
तिसरी-
चौथी -