शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

चिमूरचे बसस्थानक होणार ‘हायटेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:08 AM

चिमूर विधानसभा क्षेत्राचे आ. कीर्तीकुमार भांगडीया मागील काही महिन्यांपासून चिमूर बसस्थानकाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नरत होते.

ठळक मुद्दे४ कोटी ५८ लाखांचा निधी मंजूर : भांगडीयांच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर विधानसभा क्षेत्राचे आ. कीर्तीकुमार भांगडीया मागील काही महिन्यांपासून चिमूर बसस्थानकाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नरत होते. नुकतीच हायटेक बसस्थानक बनविण्यासाठी प्रशासकीय कामास मंजुरी मिळाली असून या कामाची चार कोटी ५८ लाख एक हजार ३४५ रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याने आ. भांगडीयाच्या प्रयत्नाला यश आला आहे.चिमूर क्रांती नगरी म्हणून प्रचलील आहे. याठिकाणी भरणारी घोडा यात्रा सप्रसिद्ध आहे. तसेच प्रसिद्ध ताडोबा अधारी व्याघ्र प्रकल्पाला जाण्यासाठी मार्गसुद्धा आहे. त्यामुळे अनेक पर्यटक येत असतात. त्यामुळे विविध शासकीय इमारतीसह चिमूरचा बस स्थानकसुद्धा सर्वसोईयुक्त असणे गरजेचे असल्याने संबंधित शासकीय अधिकारी समवेत आ. कितीकुमार भांगडीया यांनी बसस्थानकाची पाहणी केली होती. त्यानुसार संबंधित विभागास पाठपुरावा करून अंदाज पत्रकास प्रशासकीय मंजुरी मिळवून देण्यात यश आले. अंदाजपत्रकातील निधी चार कोटी ५८ लाख एक हजार ३४५ रुपयांची मंजुरी मिळाली आहे.चिमूर बसस्थानकाची पूनर्बाधणी करण्याच्या कामास उपाध्यक्ष व संचालक मंडळाने प्रशासकीय मंजुरी दिली असून त्यात बसस्थानक इमारतीत आठ फलाटांची इमारत बांधणे यासाठी तीन कोटी १९ लाख ७४ हजार ६०५ रुपये, वाहन तळावर डांबरीकरण करणे व पेव्हर बाल्स बसविणे यासाठी ५५ लाख २२ हजार ३३३ रुपये, लँड स्केपिंग करणे तीन लाख दोन हजार ७५९ रुपये, पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्था करणे १६ लाख ४५ हजार ८७५ रुपये, विद्युत काम ३१ लाख ९७ हजार ४६० रुपये व आदी तरतुदीनुसार चार कोटी ५८ लाख एक हजार ३४५ रुपयांच्या कामाची मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे सर्व सोयींयुक्त सदर बसस्थानक बनणार असून प्रवाशांना आकर्षण केंद्र बनणार आहे.चिमूरच्या बसस्थानक पुनर्बाधनीसाठी निधी खेचून आणल्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तर चिमूरात सुसज्ज व सर्व सोईउपयुक्त असे बसस्थानक बांधण्यात येणार असून शहराचे सुशोभिकरणात भर पडणार आहे. त्यामुळे नागरिकांत आनंद व्यक्त होत आहे.