लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर नगर परिषदेवर मागील सात महिन्यांपासून काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष व उपाध्यक्ष विराजमान आहे. असे असताना भाजपचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या मार्गदर्शनात नगरसेवक सतीश जाधव यांनी व्युहरचना रचली. त्यामुळे विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेस नगरसेवक सहभागीच झाले नाही. परिणामी भाजपाच्या चारही नगरसेवकांची विषय समिती सभापती पदावर अविरोध निवड झाली. यामुळे काँग्रेस गटाला चांगलाच धक्का बसला असून भाजप गटात नवचैतन्य पसरले आहे.चिमूर नगर परिषदेच्या वार्षिक विषय समितीची निवडणूक प्रक्रिया गुरुवारी सकाळी ११ वाजता पिठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी भैय्यासाहेब बेहरे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आली. दुपारी ३ वाजता सभापती पदाचे नामनिर्देशन पत्र भरण्यात आले. यामध्ये काँग्रेस गटाने विषय समिती निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहत नामनिर्देशन पत्र भरले नाही तर फक्त भाजपच्याच नगरसेवकांनी नामनिर्देशन पत्र भरले. त्यामुळे विषय समिती सभापतीच्या निवडणुकीत बांधकाम सभापती नितीन कटारे, अर्थ व नियोजन सतीश जाधव, समाजकल्याण भारती गोडे तर पाणी पुरवठा सभापतीपदी हेमलता नन्नावरे यांची अविरोध निवड झाल्याची घोषणा पिठासीन अधिकारी भय्यासाहेब बेहरे यांनी केली.आमदारांची यशस्वी खेळीचिमूर पालिकेत भाजपाचे सहा, काँग्रेसचे पाच व अपक्ष चार असे नगरसेवक निवडून आले. तेव्हा आ. कीर्तीकुमार भांगडिया यांनी भाजप व अपक्ष असे मिळून एक गट तयार केला होता. गुरुवारी झालेल्या सभापतीच्या निवडणुकीत अपक्षांना काँग्रेससोबत जाता येत नव्हते. त्यामुळे काँग्रेसचा पराभव निश्चित होता. त्यामुळे ते निवडणुकीपासून दूर राहिले.काँग्रेस नगरसेवक गैरहजरगुरुवारी नगर परिषद सभागृहात घेण्यात आलेल्या विषय समिती सभापती निवडणुकीच्या विशेष सभेत काँग्रेसचे नगराध्यक्ष गोपाल झाडे, उपाध्यक्ष तुषार शिंदे, सदस्य कदिर शेख, अॅड. अरुण दुधनकार, कल्पना इंदूरकर, श्रद्धा बंडे तसेच शिवसेनेचे उमेश हिंगे, सीमा बुटके हे गैरहजर होते.
चिमूर पालिकेत सत्ताधारी काँग्रेस गटाला हादरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:20 AM
चिमूर नगर परिषदेवर मागील सात महिन्यांपासून काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष व उपाध्यक्ष विराजमान आहे. असे असताना भाजपचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या मार्गदर्शनात नगरसेवक सतीश जाधव यांनी व्युहरचना रचली. त्यामुळे विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेस नगरसेवक सहभागीच झाले नाही.
ठळक मुद्देचारही सभापती पदांवर भाजपाचा कब्जा