शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

चिमूर तालुक्यात हजार मुलांमागे ९६५ मुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:09 PM

मुलाला वंशाचा दिवा मानून मुलींच्या अस्तित्वालाच नाकारणाऱ्या बुरसटलेल्या समाजाचा विळखा हळूहळू सैल होऊ लागला असल्याचे चित्र दिसत आहे. मुलगी होणे हे कमीपणाचे लक्षण मानण्याची प्रवृत्ती चंद्रपूर जिल्ह्यात हळू-हळू कमी होत असल्याचे दिसत आहे. याचे उदाहरण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात मागील पाच वर्षांपासून वाढ झाली असून एक हजार मुलांच्या मागे ९३६ इतक्या मुलींचे प्रमाण आहे.

ठळक मुद्देशासकीय जनजागृतीचा होतोय परिणाम : मुलीचा जन्मदर हळूहळू वाढतोय

राजकुमार चुनाारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : मुलाला वंशाचा दिवा मानून मुलींच्या अस्तित्वालाच नाकारणाऱ्या बुरसटलेल्या समाजाचा विळखा हळूहळू सैल होऊ लागला असल्याचे चित्र दिसत आहे. मुलगी होणे हे कमीपणाचे लक्षण मानण्याची प्रवृत्ती चंद्रपूर जिल्ह्यात हळू-हळू कमी होत असल्याचे दिसत आहे. याचे उदाहरण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात मागील पाच वर्षांपासून वाढ झाली असून एक हजार मुलांच्या मागे ९३६ इतक्या मुलींचे प्रमाण आहे.चंद्रपूर जिल्ह्यात प्रति एक हजार मुलांमागे मुलींचा दर ९३६ इतका वाढला आहे. एक हजार मुलांमागे मुलींच्या जन्माचे प्रमाण सन २०१३ मध्ये ९५४ होते. त्याच्यानंतर २०१४ पासून ते आजपर्यंत मुलींचा जन्मदर सरासरी ९५४ ते ९६७ पर्यंत गेल्यामुळे जिल्ह्यात मुलींचे म्हणजेच सावित्रीच्या लेकींचे स्वागत होत आहे.तसे पाहिले तर एक हजार मुलांमागे ९५० इतक्या मुली हा जन्मदर समाजाच्या स्वास्थ्याच्या व वैद्यकीय दृष्टीकोनातून महत्त्वाचा निर्देशांक मानला जातोय. चंद्रपूर जिल्ह्यात मुलगा हवा आहे, या हट्टापोटी अनेक स्त्रीभ्रूणहत्या झाल्या आहेत. त्यामुळे मागील पाच वर्षांपूर्वी मुलींच्या जन्मदरात कमालीची घट झाली होती. २००१ ते २०११ पर्यंत मुलींचे प्रमाण सर्वसामान्य इतके होते. परंतु २०१३ व २०१४ यावर्षी मुलींचे प्रमाण ९५४ ते ९६७ इतके होते. मात्र, सध्या जन्मदात्या आई-वडिलांना मुलींचे महत्त्व वाटू लागले आहे. तसेच समूपदेशन केले जात आहे. शासनाने स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी अनेक योजना अंमलात आणल्यामुळे मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे.सध्या केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभाग, महानगरपालिकासारख्या स्थानिक स्वराज्य संस्था सरकारी रूग्णालयात मुलींच्या जन्मासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच परिणाम म्हणून मुलींच्या जन्मदरात वाढ होत आहे. मुलींची घटती संख्या ही एक भयंकर सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. याची जाणीव नवीन पिढीला झाली आहे. त्यामुळे नवीन पिढीमध्ये मुलगा, मुलगी असा भेद करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.असा वाढत गेला मुलींचा जन्मदरविशेष म्हणजे, जिल्ह्यात स्त्रीभ्रूणहत्या पूर्णपणे रोखण्यामध्ये यश आले नसले तरी शासनाच्या पातळीवर अनेक उपाययोजना केल्या जात असल्यामुळे मुलींचा जन्मदराचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यात चिमूर तालुक्यात एक हजार मुलामागे सर्वाधिक मुलींचे प्रमाण ९८६ इतके आहे मागील पाच वर्षांपासून मुलीचा जन्मदर सरासरी ९३४ ते ९६७ पर्यंत गेला आहे. २०१३ ते २०१८ पर्यंतचा मुलींचा जन्मदर असा आहे. २०१३ मध्ये ८५४, २०१४ मध्ये ९६७, २०१५ मध्ये ८७७, २०१६ मध्ये ८९०, २०१७ मध्ये ९३४ व २०१८ मध्ये ९८६ इतका जन्मदर एक हजार मुलांमागे आहे.