चंद्रपूर : केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती एलपीजी गॅसचे दर वाढवून संपूर्ण देशात महागाईचा भडका उडविला आहे. २०१४ पासून सत्तेवर आलेल्या मोदीप्रणीत भाजप सरकारने महागाई कमी करण्याऐवजी मोठ्या प्रमाणात महागाई करून ठेवली आले. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. या सिलिंडर दरवाढीच्या निषेधार्थ अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रवीण खोबरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर येथे चूल पेटवा आंदोलन करण्यात आले.
दैनंदिन गरजा भागवण्यासाठी सर्वसामान्य जनता जिवाचे रान करत आहे. तर दुसरीकडे महागाईचा आगडोंब उसळला आहे. विविध कर लादल्याने महागाई कमी होण्यास तयार नाही. पूर्वी गॅसची सबसिडी मिळत होती. आता सबसिडी न देता जनतेला खुल्या किमतीत गॅस खरेदी करावा लागत आहे. गॅसची किंमत ९३० झाली आहे. कोरोनाच्या दोन वर्षांत सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना, महागाईने सर्वसामान्यांना भीक मागण्याची वेळ आली आहे. असे मत अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. या वेळी अशोक निमगडे, अशोक टेंभरे, राजस खोबरागडे, प्रेमदास बोरकर, मृणाल कांबळे, लीना खोबरागडे, शाहीन शेख, निर्मला नगराळे, आश्विनी खोबरागडे, अश्विनी आवळे, प्रेरणा करमरकर, ज्योती शिवनकर, गीता रामटेके, सुरेश शंभरकर, माणिक जुमडे, लीना ढोले, अनिता रामटेके, निर्मला पाटील, माया मून, मोडक, सुनीता बेताल, नितू झाडे, श्रुती कांबळे, संगीता उमरे, अनिता जोगे, छाया थोरात, रजश्री शेंडे, अनिता जोंगे, सुनीता मून, शुभांगी मून, लीना देशकर, यशवंत मुजमकर, वर्षा काटकर, आनंद शेंडे, अशोक फुलझले, राहुल कांबळे, शुभम शेंडे, हर्षल खोबरागडे आदी उपस्थित होते.