मोहफूल वेचण्याकरिता गेलेल्या एका महिलेला झाडाच्या खाली चितळाचे पिल्लू आढळले. ते मरणासन्न अवस्थेत होते. कुठलाही प्रतिसाद देत नव्हते. हे बघितल्यावर त्या महिलेने मरेगाव तुकूम येथील सरपंच देवानंद सहारे यांना माहिती दिली. सरपंचांनी माहिती मिळताच ग्रामस्थांसह घटनास्थळी भेट दिली. उन्हात असलेल्या या पिलाला सावलीत नेऊन पाणी पाजले आणि वन विभागाला याची माहिती दिली. वनविभागाच्या चमूने सविस्तर पंचनामा करून चितळाच्या पिल्लूला आपल्या ताब्यात घेतले. सिंदेवाही वन विभागाने पिल्लूची काळजी घेऊन पिल्लाची अवस्था कशामुळे झाली असेल,याचा शोध घेत आहे.
ग्रामस्थांच्या सतर्कतेने बचावले चितळाचे पिल्लू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:27 AM