येथील सर्वात जुने संत थॉमस कॅथॉलिक चर्च चे फादर मॅथ्यू यांनी सांगितले कि यावेळेस कोविड नियमाचे काटेकोरपने पालन करून गर्दी न करता नाताळ साजरा करण्यात येणार आहे सायंकाळी पार्थना घेण्यात येईल.याशिवाय संत लूकाचे देवालय,मेथाडिस्ट चर्च,हिंदी मेथाडिस्ट चर्च,इंडिया मिशन चर्च,फ्री मेथाडिस्ट चर्च येथेही गर्दी न करता साधेपणाने ख्रिसमस चा सण साजरा करण्यात येत असल्याचे डेव्हिड कामपेल्ली यांनी सांगितले.
कोरोनाचा विद्यार्थ्यांना हि फटका बसला आहे कान्व्हेंट स्कुल मध्ये दरवर्षी भव्य रोषणाई करून येशू ख्रिस्ताचा जन्म सोहळा कॅरोल गीताने साजरा होत असतो डेकोरेशन व देखावे करण्यात येते सांताक्लाज ची वेशभूषा करून विद्यार्थी हा सण आनंदाने साजरा करतात परंतु कोरोनात शाळाही बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
- मंगल जीवने