शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

पाण्यासाठी महिलांचा कंत्राटदाराला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 10:27 PM

नवीन चंद्रपूर परिसरात असलेल्या म्हाडा कॉलनीमध्ये मागील काही दिवसांपासून पाणी टंचाई सुरु झाली आहे. ही टंचाई कंत्राटदार करीत असल्याच्या भावनेतून येथील महिलांनी शुक्रवारी म्हाडाच्या कार्यालयात धडक दिली. एवढेच नाही तर, त्याला चांगलेच धारेवर धरले.

ठळक मुद्देम्हाडा कॉलनीत पाणीबाणी: आठ दिवसांपासून पाणी पुरवठा बंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नवीन चंद्रपूर परिसरात असलेल्या म्हाडा कॉलनीमध्ये मागील काही दिवसांपासून पाणी टंचाई सुरु झाली आहे. ही टंचाई कंत्राटदार करीत असल्याच्या भावनेतून येथील महिलांनी शुक्रवारी म्हाडाच्या कार्यालयात धडक दिली. एवढेच नाही तर, त्याला चांगलेच धारेवर धरले. महिलांचा आक्रमण पवित्रा बघता कर्मचाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात चर्चा करण्यात आली. यावरही महिलांचे समाधान झाले नाही. त्यानंतर महिलांनी पाणी पुरवठा करणाºया एमआयडीसी कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.चंद्रपूर शहरात आता जागा उपलब्ध नसल्याने नागरिकांचा ओढा नवीन चंद्रपूरकडे आहे. त्यातच म्हाडाचे घर कमी किंमतीत मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांनी म्हाडाला पसंती दिली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस येथे नागरिकांची संख्या वाढत आहे. म्हाडा कॉलनीला एमआयडीसीकडून पाणी पुरवठा केला जातो. त्यानंतर कंत्राटदारामार्फत कॉलनीमध्ये पाणी पुरविल्या जाते. मागील काही दिवसांपासून येथे अनियमित पाणी पुरवठा केला जात असल्याने महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यातच मागील आठ ते दहा दिवसांपासून पाणी पुरवठा पुर्णत: ठप्प झाला आहे. त्यामुळे महिलांचा पारा भडकला आणि त्यांनी थेट म्हाडाच्या कार्यालयात आपला मोर्चा नेला. यावेळी पाणी पुरवठा कंत्राटदार डी.पी. आत्राम यांना घेराव घातला. महिलांचा रोष बघता येथील कर्मचाºयांनी पोलीसांना पाचारण केले. त्यानंतर पोलीस म्हाडाच्या कार्यालयात पोहचले. पोलिसांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. यावेळी कंत्राटदाराने एमआयडीसी कडून पाणी पुरवठा होत नसल्याने आपण पाणी पुरवठा करण्यास असमर्थ असल्याचे महिलांना सांगितले. मात्र त्यांचे समाधान झाले नाही. त्यानंतर कंत्राटदारासह येथील अधिकाºयांना घेऊन महिलांनी थेट एमआयडीसी कार्यालय गाठले. येथील अधिकाºयांना पाणी पुरवठा होत नसल्याबाबत जॉब विचारला. यावेळी अधिकाºयांनी नदीतील पाण्याती पातळी कमी असल्यामुळे योग्य दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याचे कारण सांगितले. मात्र त्यांचे समाधान झाले नसून पाणी पुरवठ करण्याची मागणी लागून धरली.कंत्राटदाराच्या कामगाराला मारहाणम्हाडा परिसरात पाणी पुरवठा करण्याची ज्या कंत्राटदारावर जबाबदारी आहे. त्याच्या कामगाराला काही दिवसापूर्वी येथील नागरिकांनी नियमित पाणी पुरवठा करीत नसल्यामुळे मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तो कामगार काम सोडून गेल्याचे समजते.टँकरचालकाला मारहाणकाही दिवसांपासून म्हाडा कॉलनीमध्ये पाणी पुरवठा होत नसल्याने टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र काहीनी टँकरचालकाला शिविगाळ तसेच मारहाण केली. त्यामुळे टँकरचालक येथे जाण्यास नकार देत असल्याने पोलीस बंदोबस्तात पाणी पुरवठा करण्यात आला.म्हाडा कॉलनीमध्ये एमआयडीसीकडून पाणी पुरवठा केला जातो. मागील काही दिवसांपासून पाण्याचा दाब कमी असल्यामुळे कॉलनीमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली. एमआयडीसीकडून पाणीच आले नसल्याने आम्ही पाणी पुरवठा करण्यास असमर्थ आहे. आम्ही केवळ आलेले पाणी वितरित करतो. योग्य दाबाने पाणी मिळाल्यास पुरवठा केला जाईल.-डी.पी. आत्राम,पाणी पुरवठा कंत्राटदार, म्हाडा चंद्रपूरम्हाडामध्ये एमआयडीसी आणि जीवन प्राधिकरणाकडून पाणी घेतल्या जाते. मुळात नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने हा गोंधळ झाला. यासाठी डॅम तसेच इतर नदीतून पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकाºयांसह इतर अधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे.- श्रीमती टेंभुर्णे,कार्यकारी अभियंता, म्हाडा

टॅग्स :water shortageपाणीटंचाई