लोकमत न्यूज नेटवर्क
माढेळी : मागील काही दिवसांपासून सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या माढेळी-नागरी रस्त्यामुळे नागरिकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. मात्र प्रशासनाला याचे काही एक घेणे-देणे नाही, असा रोष ग्रामस्थांमध्ये दिसून येत आहे.
या मार्गाची समस्या घेऊन परिसरातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि नागरिकांचे एक शिष्टमंडळ निवेदनासह उपविभागीय अधिकाऱ्यांकडे गेले होते. मात्र उपविभागीय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांसाठी वेळ सुद्धा दिला नाही. हा रस्ता खराब होण्यासाठी अधिकारीही जबाबदार असल्याची भावना गावकरी व्यक्त करीत आहेत.
तहसीलदारांनी हा सरकारी रस्ता आहे. हे सरकारी काम आहे. या कामात अडथळा आणाल तर तुमच्यावर उलट कारवाई करण्यात येईल, अशी धमकीवजा सूचना या शिष्टमंडळाला दिली होती, असे गावकरी बोलत आहेत. १९ सप्टेंबरला खासदार बाळू धानोरकर यांचा जळका येते अकस्मात दौरा होता. तेव्हा त्यांनाही गावकऱ्यांनी गळ घातली असता, वाहतूक बंद करून रस्ता दुरुस्त करण्याचा शब्द दिला. मात्र अद्यापही काहीच झाले नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या एकंदर घडामोडींमुळे गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
240921\img_20210924_111813.jpg
madheli नागरी रोड ल तलावाचे स्वरूप प्राप्त झालेले दिसून येत आहे