अधिकाऱ्यांचे अभय : शाळेच्या वेळेत शिक्षक चौकातशंकर चव्हाण/ संघरक्षित तावाडे जिवतीशासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती नागरिकांना दणे आणि त्यांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी वा पातळीवर ग्रामपंचायत कार्यरत आहे. तेथे शासन व ग्रामस्थांमधील दुवा म्हणून ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात येते. मात्र, ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये नियमित उपस्थित राहात नाही. ग्रामसेवकाच्या अनियमिततेमुळे गावाचा विकास खुंटला असून महत्त्वाच्या दस्तावेजासाठी ग्रामपंचायतमध्ये चकरा माराव्या लागतात. तसेच शाळेचीही स्थिती अशीच असून शिक्षक शाळा भरण्याच्या वेळी चौकात चहा घेत असतात.जिवती तालुका जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात वसलेला आहे. तालुक्यात ३५ ग्रामपंचायती आहेत. सर्वच ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक नियुक्त करण्यात आले आहेत. नियमानुसार, शासकीय कर्मचाऱ्याने आपल्या कामाच्या मुख्यालयी उपस्थित राहणे आवश्यक आहे. परंतु अनेक ग्रामसेवक शासकीय बैठकीच्या नावावर दांडी मारत आहेत. ग्रामसेवक आठवड्यातून एक-दोन वेळा येतात. ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे त्यांना बळ मिळू लागले आहे. अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे शासकीय कामकाजावर विपरित परिणाम होत आहे.ग्रामस्थांना किंवा विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या दस्तावेजाची गरज पडली तर मोबाईलने त्यांना संपर्क करून पत्ता विचारावा लागतो. अनेक ग्रामसेवक आपले खरे लोकेशन सांगत नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या मागे चकरा माराव्या लागतात. ते उपस्थित असलेल्या ठिकाणी मागणीनुसार दाखले उपलब्ध करतात. अनेकांच्या घरकुलांचे काम पूर्ण होऊनही देयक अदा केले जात नाही. ज्यांनी पैसे दिले, त्यांची देयक वेळेवर दिली जातात.शिक्षकांच्या चौकात गप्पापहाडावरील गरीब विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी गाव तेथे शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु या शाळेतील गुरूजी शाळेच्या वेळेत जिवतीच्या मुख्य चौकात गप्पा मारत असतात. सध्या सकाळच्या पाळीत शाळा भरते. मात्र, शिक्षका ८ वाजले तरी चौकातून हलत नाहीत. मोबाईलने संदेश देऊन एकमेकांना बोलावितात. तेथे ते टाईमपास करीत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. त्यामुळे पहाडावरील शाळा रामभरोसे आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचे तीन महिन्यात एक आणि वर्षभरात चार वेळा शाळा भेटी करणे आवश्यक आहे. परंतु पहाडावरील शाळांची जबाबदारी त्यांनी एका शिक्षकाकडे सोपविल्याचे समजते. प्रत्येक ग्रामपंचायतने गावात एलईडी विद्युत दिवे खरेदी केले आहेत. ते निकृष्ट आणि कमी प्रकाश देणारे आहेत. त्यामुळे ते अल्पावधीतच बंद पडले आहेत. त्याबाबत अनेक वेळा तोंडी तक्रारी देऊनही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. या एलईडी विद्युत दिवे खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून त्याची योग्य चौकशी करण्यात आल्यास मोठा घोटाळा उघडकीस येऊ शकतो.
ग्रामसेवकांच्या दांड्यामुळे नागरिक कंटाळले
By admin | Published: April 15, 2017 12:42 AM