चंद्रपूर : रस्त्यावर एखाद्या वेळी अपघात घडला तरी जखमीला बराच वेळ घटनास्थळीच पडून रहावे लागले. त्याच्या मदतीसाठी कुणीही समोर येत नाही. कारण अनेकवेळा अशी मदत करणाऱ्यांच्याच मागे पोलिसांचा ससेमिरा लागतो अन् तो टाळण्यासाठी म्हणून मग कुणीही तडफडणाऱ्या जखमींच्या सादेला प्रतिसाद देत नाही. परिणामी अनेकांना तत्काळ उपचाराअभावी आपले प्राण गमवावे लागतात. राज्यात अशा हजारो घटना घडल्या आहेत. खरं तर अपघातानंतर जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तीस पोलिसांकडून कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. परंतु याबाबत फारशी माहिती नसल्याने लोकांमधील गैरसमज कायम आहे. (नगर प्रतिनिधी)याचाही विचार करा...\अपघातसमयी मदत करणाऱ्यालाच विविध प्रश्न विचारले जातात. जणू त्यानेच अपघात घडविला आहे. असे या मदत करणाऱ्याला वाटते. शासनाने जनजागृतीसाठी मोठमोठे फलक लावले आहेत. परंतु कधीकधी पोलीस मदत करणाऱ्यालाच भांबावून सोडतात हे खरे आहे. अपघात पंचनाम्यावर सही केल्यास मदत करणाऱ्या व्यक्तीला कोर्टात बोलावले जाते. जोपर्यंत ती केस मिटत नाही. तोपर्यंत त्या मदत करणाऱ्याच्या कोर्र्टात चकरा सुरुच असतात.असे गैरसमज आहे. मात्र असे काहीही नसते.\
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी नागरिकांच्या गैरसमजुती
By admin | Published: January 18, 2015 11:18 PM