शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
2
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
3
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
4
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
6
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
7
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
8
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
9
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
10
मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका
11
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
12
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
13
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
14
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
15
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
16
Mithun Chakraborty : "उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना
17
WhatsApp वर सुरू आहे स्कॅमर्सकडून फ्रॉडगिरी, स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असल्याल वापरा या टिप्स
18
"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट
19
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
20
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर

नागरिकांच्या आरोग्याचे प्रशासकीय धिंडवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:52 PM

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. डेंग्यूसदृश तापाने या महिनाभरात अनेकांचा बळी गेला आहे. शासन नागरिकांच्या आरोग्यासाठी नानाविध योजना राबविते. त्यासाठी कोट्यवधींचा खर्चही केला जातो.

ठळक मुद्देघाणीचा विळखा अन्फॉगिंग बंद : प्रशासनानेच लोटले आजाराच्या खाईत

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. डेंग्यूसदृश तापाने या महिनाभरात अनेकांचा बळी गेला आहे. शासन नागरिकांच्या आरोग्यासाठी नानाविध योजना राबविते. त्यासाठी कोट्यवधींचा खर्चही केला जातो. मात्र जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयात या योजना फाईलीत गुंडाळून नागरिकांना आजारांच्या खाईत लोटण्याचे संतापजनक प्रकार होत आहे. डेंग्यू, मलेरियाच्या डासांना हद्दपार करणाऱ्या फागिंग मशीन्सबाबत जिल्हा परिषदेने हाच कित्ता गिरवला आहे. अनेक गावातील फॉगिंग मशीन्स बंद असतानाही जिल्हा परिषद प्रशासनाला साधा डास चावल्याची जाणीव होऊ नये, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून संबोधले जाते. मुंबईच्या मंत्रालयातून येणाºया विविध विभागातील योजना या मिनी मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत पोहचविण्याचे युध्दस्तरीय काम होत असते. मात्र अलिकडे हे मिनी मंत्रालय डस्टबीनसारखेच काम करीत असल्याचे दिसून येत आहे. आल्या योजना की गुंडाळल्या फाईलीत असेच समीकरण सुरू आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. मलेरिया, डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याचे वृत्त जिल्ह्यातील अनेक गावांमधून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव आरोग्य केंद्रांतर्गत एक जण डेंग्यू पाजिटीव्ह निघाला. आणखी अनेक गावात असे रुग्ण असण्याची शक्यता आहे.साथीचे आजार पसरल्याची तक्रार आली की जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग केवळ शिबिर लावून मोकळे होतात, असा अनुभव आहे. डासांचा नाईनाट करणाºया फॉगिंग मशीन्सचा पुरवठा शासनाने गावागावांमध्ये केला. केवळ मशीन्स पुरवून प्रशासन गप्प बसले. प्रत्यक्षात या मशीन्स धूळखात आहे. नागरिकांचे स्वास्थ बिघडत आहे. केवळ कागदोपत्री या मशीन्स वाटून प्रशासन धन्यता मानत असली तरी दुसरीकडे डासांनी आपले काम सुरू ठेवले आहे. प्रशासनाच्या डोळ्यादेखत नागरिकांचे बळी जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील जवळजवळ प्रत्येक तालुक्यामधील गावांमध्ये असलेल्या फॉगिंग मशीन्स बंद असल्याची माहिती आहे. बोटावर मोजण्याइतक्या शहरातील फॉगिंग मशीन्स सुरू आहेत. मात्र त्याचा उपयोग होताना दिसत नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.फवारणी करणारे प्रशिक्षकच नाहीजिल्हा परिषद ग्रामपंचायतींना फॉगिंग मशीन्स देऊन मोकळे झाले. मात्र या फॉगिंग मशीन्स हाताळण्याचे प्रशिक्षण ग्रामपंचायत स्तरावर अनेकांकडे नाही. जिल्हा परिषदेने फॉगिंग मशीन्स देताना फवारणी करण्याचे प्रशिक्षण देण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे मशीन्स देऊनही अनेक ठिकाणी फवारणी होताना दिसत नाही.चंद्रपूर स्वच्छ; तरीही डासांचा प्रकोपमागील दीड वर्षात चंद्रपूर बºयापैकी स्वच्छ झाले. घराघरातून कचरा संकलित होत आहे. मात्र अनेक ठिकाणी नाल्यांची समस्या आहे. काही वस्त्यांमध्ये नाल्याच नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहताना दिसते. त्यातही अनेक भागात औषधांची फवारणी होत नाही. त्यामुळे चंद्रपुरातही डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. जवळजवळ संपूर्ण शहरातील वॉर्डांमध्ये डासांनी आपला उत्पात मांडला आहे.