शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

वाघाच्या बंदोबस्तासाठी आठ गावांतील नागरिक झाले आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2022 5:00 AM

शेजारी वैनगंगा नदी आहे. या गावालगतच्या जंगलात  वाघ व बिबट या हिंस्त्र प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. हे सर्व गावे कृषी प्रधान असून संपूर्ण शेती ही जंगल परिसरात व वैनगंगा नदीचे शेजारी आहे. शेतकऱ्यांना  शेतीची कामे करण्याकरिता जावेच लागते. त्या वेळात जंगलात व नदीचे परिसरात दबा धरून बसलेले वाघ शेतीचे कामे करीत असलेल्या शेतकऱ्यांवर हल्ला चढवून त्यांना जिवंत मारत असल्याचा आरोप करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : मागील आठवड्यात हळदा येथे दोन दिवसात वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकऱ्यांचा बळी गेला, तर एक शेतकरी कसाबसा बचावला. हळदासह परिसरातील जनतेमध्ये वन विभागाप्रति तीव्र असंतोष निर्माण झाला होता. पाच दिवस उलटूनही त्या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यात आला नाही. ठोस उपाययोजनाही करण्यात आल्या नाही. अखेर गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या जनसंपर्क कार्यालय  व वनविभाग कार्यालयासमोर मंगळवारी निदर्शने व धरणे आंदोलन केले. घोषणाबाजी करत निवेदन देण्यात आले.प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील हळदा, बोडधा, कुडेसावली, मुडझा, बलारपूर, आवळगाव, वांद्रा, चिचगावसह अनेक गावे मोठ्या जंगलालगत वसलेली आहेत. लागूनच शेजारी वैनगंगा नदी आहे. या गावालगतच्या जंगलात  वाघ व बिबट या हिंस्त्र प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. हे सर्व गावे कृषी प्रधान असून संपूर्ण शेती ही जंगल परिसरात व वैनगंगा नदीचे शेजारी आहे. शेतकऱ्यांना  शेतीची कामे करण्याकरिता जावेच लागते. त्या वेळात जंगलात व नदीचे परिसरात दबा धरून बसलेले वाघ शेतीचे कामे करीत असलेल्या शेतकऱ्यांवर हल्ला चढवून त्यांना जिवंत मारत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी किसान सभेचे जिल्हा सचिव विनोद झोडगे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. महेश कोपुलवार, महेंद्र ज्ञानवाडकर, हळदा येथील माजी उपसरपंच संजय लोणारे, ग्रामपंचायत सदस्य धनराज लोणारे, कालिदास इटनकर, ज्ञानेश्वर झरकर, मीनाक्षी गेडाम, रुपाली नखाते, सविता कामडी, लोमेश चदनखेडे, पीतांबर म्हस्के, बोडधा येथील सरपंच मनीषा झोडगे, ग्रामपंचायत सदस्य उसन ठाकरे, कुडेसावलीचे सरपंच चक्रधर गुरनुले व गावकरी उपस्थित होते. वनविभागाचे सहायक उपवनसंरक्षक  चोपडे, वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी  शिंदे, ठाणेदार रोशनकुमार यादव यांच्यासह तगडा पोलीस बंदोबस्त होता.

 

टॅग्स :FarmerशेतकरीTigerवाघ