दत्तात्रय दलाल
ब्रह्मपुरी : शासनाने गोदरीमुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी प्रत्येक घरी शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी योजना राबविली. त्यातून १२०० रुपयांचे अनुदान देण्यात आले. उघड्यावर कुणीही शौच करू नये. याकरिता युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. मात्र, ग्रामीण भागात बांधण्यात आलेल्या शौचालयाचा वापर सरपण ठेवण्यासाठी करण्यात येत आहे तर उघड्यावर शौच करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी हागणदारी मुक्तीकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येते. यामुळे विविध आजार निर्माण होण्याचा धोका संभवतो.
उघड्यावर शौच केल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण होते. त्यातून कॉलरासारख्या रोगांची लागण होते. त्यामुळे उघड्यावर कुणीही शौच करू नये म्हणून शासनाने विविध योजना राबविल्या. घर तिथे शौचालय ही संकल्पना राबविण्यासाठी प्रत्येक घरी शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडून १२०० रुपयांचा निधी देण्यात आला. प्रत्येक घरी यातून शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. तालुका व ग्रामीण भागात उघड्यावर कुणीही शौच करू नये यासाठी शासकीय यंत्रणेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे गोदरीमुक्त गाव योजना सफल झाली. मात्र, कालांतराने ग्रामीण भागातील नागरिकांनी हागणदारी मुक्त ग्राम योजनेकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येते. गावाच्या दुतर्फा रस्त्यावर नागरिक शौच करतात. त्यामुळे ऐन पावसाळ्यात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बांधलेल्या शौचालयाचा वापर सरपण ठेवण्यासाठी होत असल्याचे दिसून येते.
कोट
पंचायत समितीच्या मार्फत प्रत्येक ग्रामपंचायतींना याबाबत जनजागृती करण्याची सूचना करण्यात यावी. नागरिकांनी शौचालयाचा वापर करावा. यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
- रामलाल दोनडकार
सभापती, पंचायत समिती, ब्रम्हपुरी
210921\1726-img-20210921-wa0130.jpg
शौचालयाचा सरपणासाठी करण्यात येत असलेला वापर