लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्या तालुक्यातील सर्व ६० व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आल्याने प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला. मात्र, कोरोनाचा धोका अद्याप टळला नाही. यापुढेही तालुका कोरोनामुक्त ठेवण्यासाठी खबरदारी व जबाबदारी प्रत्येकालाच पार पाडावी लागणार आहे.एरवी तीन महिने आणि त्यातही ब्रह्मपूरी व सिंदेवाही या दोन्ही तालुक्यांना कोरोनाने धडक देऊनही नागभीड शहर कोरोनापासून दूर होते. मात्र ७ जून रोजी तालुक्यातील ४ व्यक्तींचे वैद्यकीय अहवाल एकाचवेळी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ माजली. अहवाल प्राप्त होताच प्रशासनाने तातडीच्या हालचाली करून संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केल्या. रूग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची यादी तयार करून त्यांना संस्थात्मक अलगीकरण केले. रूग्ण ज्या भागात राहत होता तो संपूर्ण परिसर सील करण्यात आला. कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या उद्देशाने नागभीड नगर परिषदेच्या वतीने ३६ तासांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनला नागरिकांनी प्रतिसाद दिला. ४ रूग्णांच्या संपर्कात कोण आणि किती व्यक्ती आले आहेत, याचे सर्वेक्षण आरोग्य विभागाकडून करण्यात आले. या ४ रूग्णांच्या संपर्कात एकूण ६० व्यक्ती आल्याचे स्पष्ट होताच त्यांना विलगीकरण करून तपासणीसाठी स्कॅब प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.या ६० व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल शुक्रवारी आरोग्य विभागास प्राप्त झाल. सर्व नमुने निगेटिव्ह आल्याले एका मोठ्या संकटातून तालुक्याची तुर्त सुटका झाली आहे. त्या ४ रूग्णांच्या संपर्कात आलेल्या ६० व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले म्हणून सगळाच धोका संपला असे मुळीच नाही. त्यामुळे खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य प्रशासनाने दिल्या आहेत.पावसाळ्यात समस्या वाढण्याची शक्यतारोजच परराज्य व परजिल्ह्यातील रेडझोनमधून येणाऱ्या नागरिकांची संख्या बरीच आहे. बाहेरून येणाºया व्यक्तींची माहिती प्रशासनाला कळविणे हे स्थानिक नागरिकांचे कर्तव्य काम आहे. अशा व्यक्तींना नियमानुसार अलगीकरणात ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पावसाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वत: आणि कुटुंबाची खबरदारी घेतली पाहिजे.
कोरोनामुक्तीसाठी नागरिकांनी घ्यावी खबरदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 5:00 AM
एरवी तीन महिने आणि त्यातही ब्रह्मपूरी व सिंदेवाही या दोन्ही तालुक्यांना कोरोनाने धडक देऊनही नागभीड शहर कोरोनापासून दूर होते. मात्र ७ जून रोजी तालुक्यातील ४ व्यक्तींचे वैद्यकीय अहवाल एकाचवेळी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ माजली. अहवाल प्राप्त होताच प्रशासनाने तातडीच्या हालचाली करून संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केल्या.
ठळक मुद्दे६० व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह, मात्र कोरोनापासून होणारा धोका अद्याप टळला नाही