पाण्याच्या टाक्या दुरुस्त कराव्या
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांत नळयोजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या, परंतु अद्यापही सुरळीत पाणीपुरवठा केला जात नाही. परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.
अल्पवयीनांच्या हाती वाहनांच्या चाव्या
चंद्रपूर: दिवसेंदिवस वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अल्पवयीन मुले मोटारसायकलवर स्वार होऊन सुसाट वेगाने वाहने चालवितात. त्यांच्याजवळ गाडी चालविण्याचा परवानाही नसतो. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस प्रशासनाने अल्पवयीन वाहनचालकांवर नजर ठेवून त्यांना आवर घालावा, अशी मागणी होत आहे.
समाजमंदिरांची दुरुस्ती करावी
चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश समाजमंदिर दुर्लक्षित झाले आहे. त्यामुळे याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ते दुरुस्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
जुन्या मनोरंजन साधनांकडे कल
चंद्रपूर : कोरोना संकट आता काही प्रमाणात ओरसत आहे. असे असले तरी भीती कायम आहे. त्यामुळे काही नागरिक आजही घरात रहाणे पसंत करीत आहेत. काही घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक मुलांसोबतच जुन्या मनोरंजन साधनांत दंग झाले आहेत. घरातील चिमुकल्यांसह ज्येष्ठ मंडळी हा वेळ वाचनासोबतच कॅरम, बुद्धिबळ, चव्वाअष्टा यासारख्या जुन्या मनोरंजनाच्या साधनातून घालवित आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेने नागरिक त्रस्त
चंद्रपूर : तालुक्यातील काही गावांतील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या पावसाचे दिवस आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
चित्रपटगृह सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे सिनेमागृहसुद्धा बंद आहे. मात्र, सिनेमागृहात जाऊन चित्रपट बघणाऱ्यांची बरीच निराशा होत आहे. त्यामुळे काहीजण आता टीव्हीवर जुने चित्रपट बघून आपली हौस भागवित आहेत. ग्रामीण, तसेच शहरी भागात असेच चित्र दिसत आहे. त्यामुळे इतर व्यवहाराप्रमाणे चित्रपटगृहसुद्धा सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
नालीचे पाणी रस्त्यावर
चंद्रपूर : शहरातील सिस्टर काॅलनी, नगिनाबाग, बंगाली कॅम्प आदी परिसरातील नाल्यांमध्ये कचरा तुंबला आहे. त्यामुळे नालीचे पाणी रस्त्यावर येत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नाल्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी केली जात आहे. मागील काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे परिसरात चिखल साचला आहे.