शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

शहर स्वच्छ झाले, मनेही स्वच्छ व्हावी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2017 12:34 AM

केंद्र सरकारने देशभरातील शहरांमध्ये स्वच्छतेबाबत घेतलेल्या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला.

राजेश भोजेकर । लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारने देशभरातील शहरांमध्ये स्वच्छतेबाबत घेतलेल्या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. देशातील ७२६ शहरांमध्ये चंद्रपूर शहराचा ७६ वा क्रमांक लागला. आणि राज्यात सहावा. गौरवाची बाब म्हणजे, विदर्भातील नागपूर, अमरावती आणि अकोला या महानगरांना मागे टाकत चंद्रपूरने ही बाजी मारताना विदर्भात स्वच्छतेच्या बाबतीत मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला. ही बाब चंद्रपूरकांना अभिमानास्पद वाटावी अशीच आहे. चंद्रपूरला महानगराचे स्वरुप येऊन जेमतेम पाच-सहा वर्षे झालीत. या काळात चंद्रपूरने राज्यात टॉप टेन शहरामध्ये मिळविलेला हा सन्मान चंद्रपूर बदलत असल्याचे स्पष्ट संकेत देत आहे. पुण्या-मुंबईत बसून चंद्रपूरकडे बघितल्यानंतर हे शहर अतिशय दुर्गम असल्याचे जाणवते. तसे ऐकायलाही मिळते. अधिकारी वर्गही पूर्वी या शहरात बदली घेताना विचारच करायचा. मात्र त्यांच्या लेखी दुर्गम असलेल्या या शहराने राज्यात सहावा क्रमांक पटकावून त्या सर्वमंडळींचे एकाएकी डोळे उघडले आहे. ही बाब पूर्वीपासून मिरवत आलेल्या महानगरांचे गर्वहरण करणारी आहे. या यशाचे श्रेय महापालिकेला असले तरी यामध्ये चंद्रपूरकरांचा वाटाही तेवढाच मोलाचा आहे, हे विसरता येणार नाही. पालिकेने कितीही स्वच्छता मोहिमा राबविल्या आणि त्यासाठी जनतेचे सहकार्यच नसेल, तर परिणामकारकता शून्य ठरते. एकाएकी लागलेल्या आश्चर्यकारक निकालामुळे चंद्रपूरकरांसह पालिकेची जबाबदारीही तेवढीच वाढली आहे. यापुढे हा क्रमांक कायम ठेवणे हे मोठे आव्हान असणार आहे. स्वप्न मोठेच बघितले पाहिजे. त्या स्वप्नांचा पाठलाग करताना मार्गातील अनेक अडथळे केव्हा दूर झाले हे कळतदेखील नाही. प्रयत्नच झाले नाही तर मिळाले ते स्थानही गमाविण्याची भीती असते. आणि हे अपयश खाली बघायला लावणारे ठरते. म्हणूनच चंद्रपूरकर व पालिका हे यश कसे पचविते, हे महत्त्वाचे ठरेल. पालिकेकडे अनेक योजना आहेत. या मध्यमातून ती शहराचा कायापालट करण्याचा पूरेपूर प्रयत्न करणार. या योजना जनहितार्थच असल्या तरी स्वच्छतेसारख्या काही योजनांमध्ये जनतेचाही प्रत्यक्ष सहभाग आवश्यक असतो. यासाठी जनजागृती केली जाते. वास्तविक, या जनजागृतीवर लागणाऱ्या खर्चात अनेक विकासकामेही करता येणे शक्य आहे. मात्र सामान्य मानसिकता आहे, आपला कचरा दुसरीकडे फेकून आपले घर वा परिसर स्वच्छ ठेवण्याची. मग जनजागृतीपर केलेला खर्च वाया जाणारच. ही जनजागृती एकाच विषयावर वर्षानुवर्षांपासून केली जात आहे. यावर झालेला खर्च जनतेच्या खिशातून कराच्या स्वरुपात शासनाकडे जमा पैशात असतो. काहीच लोकांवर या जनजागृतीचा परिणाम होतो. अनेकांना कळते पण वळत नाही. काहीजण याकडे लक्षही द्यायला तयार नसतात. मात्र आपणच कचरा फेकल्यानंतर पालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले असे बोलणाऱ्यांची संख्याही कमी नाही. या विविधांगी मानसिकतेने नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर त्या योजनेचे तीनतेरा वाजलेले असते. आपण आपले घर स्वच्छ राहावे म्हणून जसा प्रयत्न करतो, तसाच प्रयत्न प्रत्येकांनी आपला परिसर व शहर स्वच्छ राहण्यासाठी केला, तर एकेदिवशी चंद्रपूर प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर झाल्यावाचून राहणार नाही. यासाठी गरज आहे ती प्रत्येक चंद्रपूरकरांनी स्वच्छतेचा ध्यास घेण्याची.