शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

पिण्याच्या पाण्यासाठी खडकीतील कोलामाचा संघर्ष

By admin | Published: March 07, 2017 12:36 AM

पावसाळ्यात कितीही पाऊस पडला तरी जिवती तालुक्यात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो.

जिवती : पावसाळ्यात कितीही पाऊस पडला तरी जिवती तालुक्यात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. यामुळे पहाडावरील अनेक गावात टँकरने पाणी पुरवठा केला जातो. यावर मात करण्यासाठी व टँकरमुक्त गावे करण्यासाठी शासन स्तरावरून वेगवेगळे प्रयोग केले जातात. तरीही जीवती तालुक्यातील खडकी, रायपुर, पाटागुडा या गावासह अनेक गावात मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच पाणी टंचाईची झळ पोहचली असून भर उन्हात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तालुक्यातील खडकी रायपूर ग्रामपंचायतीमधील खडकी, रायपूर या गावात शासनाने जलस्वराज्य प्रकल्पातून विहीर बांधकाम करण्यात आले आहेत. विहीर गावापासून दीड -दोन कि.मी.अंतरावर असल्याने खोल दरीतून अदिवासी कोलाम महिलांना डोक्यावर व कमरेवर भांडे घेऊन पिण्याचे पाणी आणावे लागते. यापेक्षाही भयानक स्थिती आहे. खडकीतील कोलामाची शासनाने विहिरीचे काम केले. मात्र काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने काही दिवसातच विहिरीवरील संरक्षण भिंत तर पडलीच पण त्यातील पाण्याचा साठाही आटला. अशा स्थितीतसुध्दा येथील नागरिक आहे त्या पाण्यावर तहान भागवित आहे .संबंधित ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने गावातील पाण्याची पातळी पाहून आवश्यकतेप्रमाणे पिण्याच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकणे आवश्यक आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसापासून या विहिरीतील पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकले जात नसल्याने परिणामी नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याची ओरड सुरू आहे. या संबंधित बाबीकडे लक्ष देवून कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सोय करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. (तालुका प्रतिनिधी)कुणीही देईना लक्ष खडकी या आदिवासी कोलाम गुड्यात केवळ १२ घराची वस्ती असून संपूर्ण कोलाम बांधव दारिद्रय रेषेखाली जीवन जगत आहेत. स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष निघून गेली. सत्ता बदलली. लोकप्रतिनिधी बदलले. परंतु खडकी गुड्यातील पाणी, वीज, आरोग्य, रस्ते या समस्या कायम आहेत. समस्या सोडविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. निवेदन दिली. पण कुणीही या गुड्याकडे फिरकले नाहीत.