लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मोठा गाजावाजा करून ग्रामीण भागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मात्र काही गावात या अभियानाचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे जनजागृती करून स्वच्छतेचे धडे द्यावे, अशी मागणी केली जात आहे.गावखेड्यात तसेच शहरात स्वच्छतेचा अभाव बघून शासनाने राष्टÑपुरूषांच्या नावाने स्वच्छता अभियान सुरू केले. प्रथम या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र दिवसेंदिवस आता या अभियानाकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. स्वच्छतेसाठी शासनाला ग्रामस्थांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. त्यासाठी विविध योजना आणल्या जातात. मात्र आठ-नऊ वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या हागणदारी मुक्त योजनेचाही आता काही गावांत फज्जा उडाल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागात घरोघरी शौचालय बांधण्यासाठी शासनाने प्रथम चार हजार ५००, नंतर नऊ हजार व आता १२ हजारापर्यंत अनुदानाचा निर्णय घेतला. मात्र अनेकांनी थातुरमातूर शौचालय बांधून केवळ अनुदानाची रक्कम लाटली आहे. अनेक गावांपासून एक किलोमीटर अंतरापर्यंतच्या मार्गावरच अद्याप प्रात:विधी आटोपले जात आहै. प्रवास करताना कोणतेही गाव आल्यानंतर नागरिकांना नाकाला रूमाल लावावा लागतो. यामुळे संबंधित ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्नही बिकट होत आहे. ग्रामीण भागातील मोजकीच कुटुंबे शौचालयाचा वापर करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.जनजागृती मोहीम थंडावलीपूर्वी स्वच्छता अभियानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. मात्र आता सदर मोहीम थंडावली असल्याचे दिसून येत आहे. शासनाने अनेक स्वच्छतादुतांची नेमणूक केली. मात्र हे स्वच्छतादुतसुद्धा कोणत्याही प्रकारची जनजागृती करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन स्वच्छतेची मोहीम व्यापक स्वरुपाची तयार करावी, अशी मागणी होत आहे.
स्वच्छता अभियान केवळ कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 5:00 AM
गावखेड्यात तसेच शहरात स्वच्छतेचा अभाव बघून शासनाने राष्टÑपुरूषांच्या नावाने स्वच्छता अभियान सुरू केले. प्रथम या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र दिवसेंदिवस आता या अभियानाकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. स्वच्छतेसाठी शासनाला ग्रामस्थांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. त्यासाठी विविध योजना आणल्या जातात.
ठळक मुद्देग्रामीण भागातील स्थिती : प्रशासनाकडून जनजागृती करावी