शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

पहाटेपासून स्वच्छता मोहीम

By admin | Published: May 07, 2017 12:37 AM

देसाईगंज तालुका गोदरीमुक्त झाल्याचे सुतोवाच केले जात असले तरी कुरूड येथे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येते.

विकासाची सुरूवात : कुरूड येथे महिलांचा पुढाकारलोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज तालुका गोदरीमुक्त झाल्याचे सुतोवाच केले जात असले तरी कुरूड येथे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येते. उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचेही प्रमाण येथे अधिक आहे. या गंभीर बाबीकडे स्थानिक प्रशासनाने नेहमीच दुर्लक्ष केले. ही बाब महिलांच्या लक्षात आल्यानंतर गावातील दारूबंदी महिला समितीने पुढाकार घेऊन पहाटेपासूनच स्वच्छता अभियान राबवून गावात विकास कामांचा पाया घालण्यास सुरूवात केली आहे. परिसरातील सर्वात मोठी ग्राम पंचायत म्हणून ओळख असलेल्या कुरूड येथे शंकरपटानिमित्त एकाच रात्री आठ ते दहा नाटकांचे प्रयोग सादर केले जातात. त्यामुळे पूर्व विदर्भात गावाचा नावलौकिक पूर्वीपासूनच आहे. सध्या गावाची लोकसंख्या ६ हजार ५०० च्या आसपास आहे. गावात सर्वच मोठ्या एकोप्याने उत्साहात साजरे होते. मात्र विकासात्मक दृष्टीने गावाचा विचार केला तर गावात अनेक समस्या असल्याचे दिसून येते. गावातील दारूबंदी व अवैैध धंदे बंद करण्याकरिता पुढे सरसावलेल्या महिलांना अनेक चढाओढींचा सामना करावा लागत आहे. परंतु ग्रा. पं. पदाधिकारी, तंमुस पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. विविध विकासकामे करताना महिलांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. परंतु त्यांना मदत करण्यास कुणीही धजावत नसल्याचे दिसून येते. १ मे रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत महिलांनी सदर मुद्दा उपस्थित केला असता, सहकार्य करण्याचे आश्वासन ग्रा. पं. ने दिले होते. गावात स्वच्छता ठेवण्यासाठी उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचा भजनदिंडीच्या गजरात स्वागत करण्याचाही निर्णय घेण्यात आला. गावातील महिला श्रमदानातून पहाटेपासूनच गावाची स्वच्छता करीत आहेत.