लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत २५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम गांधी जयंती निमीत्त केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी चंद्रपूर येथील रेल्वेस्थानक परिसरात महानगरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या तसेच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या उपस्थितीत स्वच्छता करण्यात आली.स्वच्छता कार्यक्रमास उपमहापौर अनिल फुलझेले, चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीचे दामोदर मंत्री, रमणीक चव्हाण, डॉ. भुपेश भलमे, महावीर मंत्री, रमेश बोथरा, रमाकांत देवरा, श्रवण मंत्री, पप्पू जाधवानी, नरेश लेखवानी, अशोक रोहरा, मधुसूदन रूंगठा, राजेश सादरानी, पुनम तिवारी, रोडमल गहलोत, अशोक भुप्ता, राजन नेरलवार डॉ. अशोक भुक्ते, डॉ. सचिन सरदेशपांडे, डॉ. बालमुकुंद पालीवाल, डॉ. अशोक वासलवार, डॉ. मनिष मुंधडा, डॉ. अशोक पालीवाल, डॉ. राऊत, डॉ. करमरकर, मनपा सभापती अनुराधा हजारे, नगरसेवक राजेश मून, रेल्वेचे डीसीएम अजय डेनियल, स्टेशन प्रबंधक, रामलाल सिंह, कमर्शियल मॅनेजर कृष्णकुमार सेन, आर.पी.एस. इन्चार्ज ठाकूर, स्टेशन मास्टर एच.पी. सिंग आदी मान्यवरांनी अभियानात सहभाग घेत परिसराची स्वच्छता केली.यावेळी ना. अहीर यांनी उपस्थित सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. तसेच कारागृहातील वीर शेडमाके स्मृति स्थळ परिसरातही स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक तसेच कारागृह अधीक्षक डोले, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगत, संजय मिसलवार, रामकिशोर सारडा, विनोद शेरकी, कारागृहातील अधिकारी, बंदीवान या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.
रेल्वेस्थानकासह विविध ठिकाणी स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 11:38 PM
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत २५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
ठळक मुद्देस्वच्छता मोहिमेचा समारोप : हंसराज अहीर यांची प्रमुख उपस्थिती