लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरात फलके लावून स्वच्छता होत नसते तर त्यासाठी घाम गाळावा लागतो. चंद्रपूर शहर महानगर पालिकेतील सफाई कामगार मागील अनेक वर्षांपासून प्रामाणीकपणे करीत आहेत. मात्र या स्वच्छतादुतांवरच दिवाळी सणातच आमरण उपोषण करण्याची वेळ आली, असा आरोप कामगार करीत आहेत. मागील तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान, कामगारांच्या मागण्या रास्त असून त्या तात्काळ सोडवण्यात याव्या, अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी केली आहे.विविध मागण्यांकरीता महानगर पालिकेतील नाली सफाई कामागारांनी कामबंद आंदोलन पुकारत महापालिकेसमोर ठिया मांडला आहे. जोरगेवार यांनी शुक्रवारी या आंदोलनाला भेट दिली. यावेळी कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. शहरातील घाण साफ करुन चंद्रपूरकरांचे आरोग्य धोक्यात आले होते.त्यातच आता कामगारांच्या आंदोलनामूळे शहरातील नाल्यांची सफाई होत नसल्याने रोगराई पसरण्याची शक्यता बळावली आहे. असे असतानाही सफाई कामगारांच्या आंदोलनाकडे संबंधित कंत्राटदार व मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. मात्र शहरातील आरोग्याशी खेळ खेळण्याचे काम प्रशासनाने करू नये, चंद्र्रपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून या कामगारांच्या मागण्या तत्काळ सोडवाव्यात अन्यथा कामगारांसह जनताही त्यांना उत्तर देईल, असा इशाराही कामगारांनी दिला.आंदोलनामूळे नाली सफाई कामगारांची दिवाळी अंधारात गेली आहे. ही बाब लक्षात घेता उद्या शनिवारी आंदोलनस्थळी किशोर जोरगेवार या कामगारांसह फराळ करत दिवाळी साजरी करणार आहेत. कामगारांच्या पूर्ण मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. मनपाच्या कंत्राटी कामगारांना नियमित वेतन दिले जात नाही.किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याकडे दुर्लक्ष होत आहे.कामगारांना साप्ताहिक सुट्टी मिळत नाही. वेतनाच्या पावत्या मिळत नाही. आठवड्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्याचा नियम असताना दुर्लक्ष केले जात आहे, आदी मागण्यांचे निवेदन संघर्ष समितीच्या वतीने मनपा प्रशासनाकडे देण्यात आले आहे. कामगारांनी अनेकदा लक्ष वेधले. पण, दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.
चंद्रपुरातील सफाई कामगारांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2018 10:30 PM
शहरात फलके लावून स्वच्छता होत नसते तर त्यासाठी घाम गाळावा लागतो. चंद्रपूर शहर महानगर पालिकेतील सफाई कामगार मागील अनेक वर्षांपासून प्रामाणीकपणे करीत आहेत. मात्र या स्वच्छतादुतांवरच दिवाळी सणातच आमरण उपोषण करण्याची वेळ आली, असा आरोप कामगार करीत आहेत. मागील तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.
ठळक मुद्देउपोषणाचा तिसरा दिवस : कामगारांच्या संपामुळे शहरातील स्वच्छतेची कामे ठप्प